NC Times

NC Times

नुसतं संघटना काढत बसू नका समाजाच्या आरक्षणासाठी लढा देण्याची गरज- मा.अनिल मगदुम

 
नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)-   नुसत संघटना काढून मिरवत बसण्यापेक्षा आरक्षणासाठी लढा देण्याची गरज असल्याचे मत नंदिवाले समाजाचे अध्यक्ष अनिल मगदूम यांनी समाज बांधवाना उध्देशुन बोलत होते. समाज एकत्र येण्याची कुठेही चिन्ह दिसत नाही तर  नुसता अध्यक्षासाठी भांडायचं आणि उपाध्यक्ष साठी कुठे काम करत नाही काय नाही नुसतं पदासाठी लढत बसू नका सगळं ओबीसी समाज पेटून उठलाय आपल्या समाजात कुठे काहीतरी दाखवा असे आवाहन नंदीवाले समाजाचा युवा नेतृत्व माननीय श्री अनिल यल्लाप्पा मगदूम यांनी बोलत केले आहे. 
 आपल्या लोकांना कुठलीही सवलत नाही त्यामुळे आपला नंदीवाले समाज एकत्र यायला पाहिजे आपल्या समाजालाआरक्षण व विविध दाखल्यापासून वंचित असल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही शिकलेल्या मुलांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे म्हणून आपला समाज जागा झाला पाहिजे प्रत्येकांनी संघटना काढून त्या संघटनेचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे सर्व संघटनेने मिळून आरक्षणासाठी लढा तर आपल्या समाजाला कुठेतरी फायदा होईल

 आमचा नांदीवाल्याला कर्ज कुठल्याही बँकेत मिळत नाही आमचा समाज भांडी विक्री व भंगार गोळा करतात व मोलमजुरी करतात शिकलेला मुलांवर उपासमारीची वेळ आली त्यांना व्यवसाय करण्यासाठी त्यांना बँकेत कर्ज मिळावे व महामंडळ मधून त्यांना कर्ज मिळावे नंदीवाले समाजाला  स्वतंत्र महामंडळ मिळावे म्हणून मला समाजाला सांगायचे की आपण सर्व समाज एकत्र येऊन काम केलं पाहिजे म्हणून आपला समाज कुठेतरी एकत्र येऊन काम केले पाहिजे आपला समाज अजून कुठे असेल तेच सर्वे करायला पाहिजे महाराष्ट्रभर सर्वे केला पाहिजे कुठेतरी आपल्या समाजाला न्याय मिळेल व आपल्या मुलांना व्यवसाय करण्यासाठी कुठेतरी कर्ज उपलब्ध करून मिळाला पाहिजे
 पहिला नंदीवाला समाज हा आमचा नंदीबैल घेऊन फिरत असेनंदीवाले समाजाचे साधन म्हणजे नंदीबैल फिरत असल्यामुळेआपला समाज या गावातून त्या गावात राहत असल्यामुळे 1960 चा पुरावा मिळण्याबाबत काही मुश्कील आहे भटकंती करत असल्यामुळे शाळा कोणी शिकलेला नसल्यामुळे 1960 चा पुरावा मिळत नाही त्यामुळे आमच्या पोरांच्या शाळेची गैरसोय होत आहे तरी जातीचा दाखला मिळत नाही कुठल्या तर शाळेत प्रवेश करायचा म्हटलं तर जातीचा दाखला मागतात त्यामुळे आमचे मुलं जातीच्या दाखल्यामुळे अडचणी येतात त्यामुळे मुलाशी नोकरी मिळत नाही त्यांना कुठेतरी कामाला जायची पाळी येते शिक्षण घेऊन काय उपयोग म्हणून समाजाला जाग होण्याची गरज आहे त्यामुळे संघटना एकत्र येऊन काम करावे विविध दाखल्याच्या अडचणी येतात उठा उठा आता समाज जाग होण्याची गरज आहे. 
 काही लोकांना घरकुल नाही काही लोकांना जगाव उपलब्ध नाही महाराष्ट्रातल्या नंदिवली समाजाचे जगणं मुश्कील आहे कुणाला रेशन कार्ड नाही कुणाला राहायला घर नाही कुणाला राहायला जागा नाही असा आमचा समाज उदय निर्वाह करत आहे आमच्या समाजाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे म्हणून आमच्या समाज एकत्र आलं तर सगळं काम मार्गी लागतील म्हणून मला समाजाला विनंती करायची आहे की आपण सगळेजण एकत्र येऊन आपल्या समाजाचे काम मार्गी लावूया असे आवाहन मगदुम यांनी केले आहे