NC Times

NC Times

४ ऑगस्टला कवठेमहांकाळ येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य जनजागृती रॅली


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- शिवश्री मनोज जरांगे पाटील यांची ८ ऑगस्ट रोजी सांगली येथे निघणाऱ्या भव्य शांतता व जनजागृती रॉलीच्या पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ येथे तालुका स्तरीय बैठक विकास सोसायटीच्या 'शेतकरी भवन' मध्ये संपन्न झाली.यामध्ये विविध प्रकारचे ठरावही संमत करण्यात आले. 
यामध्ये प्रामुख्याने रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता संपूर्ण तालुक्यात मोटर सायकल रॅली काढण्यात येणार असल्याचा ठराव घेण्यात आला.त्याचबरोबर सोशल मीडियावरून मराठा आरक्षणा विषयी शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी दिलेले सर्व माहिती व आदेश पोहचविणे,लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे या भुमिकेनुसार यापुढे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करु नये.तसेच ५० टक्के ओबीसी आरक्षणा मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील म्हणतील तेच धोरण व बांधतील तेच तोरण हीच भुमिका तालुक्यातील सर्व मराठा समाजाची राहील.शांतता व जनजागृती  रॅली नियोजनासाठीही गाव बैठका घेण्याचे ठरले.तर आठ ऑगस्ट नंतर मराठा समाजाचा तालुका स्तरावर मेळावा घेणे.त्याचबरोबर ८ ऑगस्ट रोजी सांगली येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठीच्या नियोजनासाठी तालुक्यात गाववार बैठका घेणे यासारखे महत्त्वाचे ठराव एकमताने सहमत करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते किशोर पाटील,कैलास पाटील,मारुती पवार पांडुरंग पाटील,रामदास सावंत,विश्वनाथ उर्फ बंडू पाटील,    अरूण भोसले,शिवदास भोसले,संजय चव्हाण तानाजी        कदम,आबासाहेब शिंदे,गुलाब माने,जगन्नाथ शिंदे  रणजित  घाडगे,अशोक पाटील,चंद्रकांत पाटील,सुशांत निकम,          आनंदा निकम,सुरज पाटील,विठ्ठल शिर्के सह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.