NC Times

NC Times

हिंगणगाव येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे):-कित्येक वर्षाची परंपरा असलेला व हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक समजला जाणारा मोहरम हा सण हिंगणगाव (ता कवठेमहांकाळ) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू,मुस्लीम ग्रामस्थ सहभागी झाले होते.
हिंगणगाव येथील ऐत्याहासीक सण म्हणून समजला जाणारा मोहरम हा सण हिन्दू व मुस्लिम लोक कित्येक वर्षांपासून एकत्रित येऊन मोठ्या गुण्यागोविंदाने साजरा करतात. या कार्यक्रमासाठी गावातील हिंदू, मुस्लिम एकत्र येऊन ढोल,हलगी, झांज च्या तालावर मोठ्या उत्साहात पंजांची मिरवणूक काढून खत्तलरात्रही साजरी करतात.गावात मोहरम या सणासाठी जैन समाजाचा प्रथम मान असतो.
  या कार्यक्रमासाठी सरपंच प्रिया सावळे,उपसरपंच नितीन पाटीलसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,सोसायटीचे चेअरमनसह सर्व सदस्य व गावातील सर्व पदाधिकारी, मंडळाच सभासद,जितेंद्र पाटील,सुलतान पाटील,अमोल सावळे,गिरीश शेजाळ,अधिक शेजाळ,राजू सपकाळ,गिरीश नन्नवरे,बबलू पाटील,शितल कुपाडे,उमेश सगरे,गजेंद्र सगरेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.