NC Times

NC Times

कृष्णा हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या महानगरपालिकेच्या उद्यानाची दुरावस्था तात्काळ दुरूस्तीची लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी


नवचैतन्य टाईम्स सांगली (प्रतिनिधी)- 
सांगली शहरातील पत्रकार नगर परिसरात असणाऱ्या  कृष्णा हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या  क्रांती चौक परिसरातील महानगरपालिकेच्या उद्यानाची गेल्या अनेक वर्षांपासून  दुरावस्था निर्माण झाली असून या उद्यानाचे लोखंडी गेट मोडून पडले आहे,उद्यानामध्ये झाडा झुडपांचे जंगल निर्माण झाले आहे .शिवाय लहान मुलांसाठी असणारे झोपाळे पूर्णपणे मोडकळीस आले आहेत .तर महानगरपालिकेचा कचरा गोळा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य याच उद्यानामध्ये अस्ताव्यस्त पडलेले  आहे. त्यामुळे या उद्यानाची अत्यंत बिकट अवस्था निर्माण झाली असून ,सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी इतर उद्यानाप्रमाणेच या उद्यानाकडेही लक्ष देऊन याला उर्जित अवस्था आणावी,त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या साठी यामध्ये वॉकिंग ट्रॅक बसण्यासाठी व्यवस्था तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्यांची व्यवस्था ताबडतोब करावी अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे .