NC Times

NC Times

ज्ञानसंकल्प विद्यामंदिर शाळेचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
कवठेमहांकाळ येथील ज्ञानसंकल्प शाळेच्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत शहरी भागातून सोळा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला असुन,त्यांच्या या यशाचे परिसरातून कौतुक केले जात आहे. 
 या शाळेतील या यशाचे मानकरी विद्यार्थी हे पुढील प्रमाणे १) कु आराध्या प्रकाश डुबुले (तालुक्यात २ री तर जिल्ह्यात १५ वी).२) कु माधुरी प्रविण जगताप (तालुक्यात ३ री तर जिल्ह्यात २८ वी).३) कु श्रेयस अनिल खोत (तालुक्यात ४ था तर जिल्ह्यात ३१ वा).४) कु श्रीजीत राम शिंदे (तालुक्यात ५ वा तर जिल्ह्यात ४२ वा).५) कु प्रणव विजयकुमार पाटील (तालुक्यात ६ वा तर जिल्ह्यात ४५ वा).६) कु हर्षवर्धन विनोदकुमार पाटील (तालुक्यात ७ वा तर जिल्ह्यात ४६ वा).७) कु राजवर्धन दिपक साखरे (तालुक्यात ९ वा तर जिल्ह्यात जिल्ह्यात ८६ वा).८) कु सुयश प्रशांत भोसले (तालुक्यात ११ वा तर जिल्ह्यात ८९ वा).९) कु हर्षवर्धन मायाप्पा वावरे (तालुक्यात १२ वा तर जिल्ह्यात ९९ वा).१०) कु वेदांत रामचंद्र नरळे (तालुक्यात १४ वा तर जिल्ह्यात ११० वा).११) कु आदित्य जयराज बर्गे (तालुक्यात १५ वा तर जिल्ह्यात १२० वा).१२) कु आकांक्षा शरद पाटील (तालुक्यात १६ वी तर जिल्ह्यात १२१ वी).१३) कु सत्यजित राजगोंडा पाटील (तालुक्यात १७ वा तर जिल्ह्यात १४३ वा).१४) कु सार्थक धोंडीराम शेजाळ (तालुक्यात १८ वा तर जिल्ह्यात १४७).१५) कु आराध्या बापूसाहेब मासाळ (तालुक्यात १९ वी तर जिल्ह्यात १४९).१६) कु वेदिका सागर पाटील (तालुक्यात २० वी तर जिल्ह्यात १६९ वी)सदर शिष्यवृत्ती परिक्षेत वरील विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.त्यांना याकामी शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री अजितराव घोरपडे-सरकार,मानद सचिव युवा नेते राजवर्धन घोरपडे-सरकार, मुख्याध्यापक भाऊसाहेब भोसले,श्रीमती नंदा शिंदेसह शिक्षक व पालकांचे यथोचित मार्गदर्शन लाभले.