NC Times

NC Times

आजोबांच्या स्मृतीपित्यार्थ नातवांचा अनोखा उपक्रम ॲनिमिया मुक्त मिशन साठी शेवग्याची १०० रोपे तयार करून केली दान...

नवचैतन्य टाईम्स कराड (प्रतिनिधी)- दिवंगत आजोबा राष्ट्रोद्धार बंडू गायकवाड यांच्या प्रथम स्मृतीदिनी आजोबांचे स्मरण करण्यासाठी चि. सौरभ समीर गायकवाड चि. स्पर्श समीर गायकवाड चि. दिग्विजय अजित साबळे तसेच चि. श्रीहर्ष पंडीत गायकवाड या नातवांनी शेवग्याची शंभर रुपये तयार करून ॲनिमिया मुक्त मिशनसाठी दान करून आजोबांची नावे एक अनोखा उपक्रम केला आहे.
(फोटो)-डावीकडून सौरभ,स्पर्श,दिग्विजय आणि           श्रीहर्ष संस्थेस रोपे देताना ..      
ॲनिमिया मुक्त भारत मिशन राबविणारी सहाय्यक ट्रस्ट ही देशपातळीवर काम करणारी संस्था असून शेणोली , कराड येथीलच मी नागरिक फाउंडेशन या मिशनमध्ये सहभागी संस्था म्हणून प्रयत्नशील आहे.नुकतेच जुळेवाडी गाव ॲनिमिया मुक्त भारत मिशन साठी त्यांनी दत्तक घेतली आहे.
आजोबांनी सदैव केलेल्या सामाजिक दायित्वाची जाण ठेवून त्यांच्या स्मरणार्थ या मिशनमध्ये सहभागी होऊन मुलांनी शेवग्याची शंभर रोपे तयार करण्याची जबाबदारी घेतली व ती दान केली आहेत.
भारतात ॲनिमिया हा आजार एक गंभीर समस्या बनली असून केंद्र राज्य सरकारच्याही अजेंड्यावर हा प्रमुख विषय आहे . अशातच सहाय्यक ट्रस्ट व मी नागरिक फाउंडेशनचे हे मिशन समाजास अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे . ॲनिमिया मुक्त भारत मिशनमध्ये सौरभ, स्पर्श , दिग्विजय आणि श्रीहर्ष या मुलांनी बालवयातच केलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.