NC Times

NC Times

नागज येथील आदर्श प्रशालेचे मुख्याध्यापक संजयकुमार झांबरे यांचे विद्या सचिवपदी बढती


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)- नागज (ता कवठेमहांकाळ) येथील आदर्श प्रशाला शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार झांबरे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ संघ मुंबईच्या विद्या सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे.यापुर्वी त्यांनी विद्या सहसचिव म्हणून काम पाहिले होते. 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाची बैठक नुकतीच सोलापूर येथे पार पडली.सदर सभेमध्ये राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या सन २०२४ ते २०२७ या कालावधीसाठीच्या कार्यकरणीच्या निवडीही करण्यात आल्या.यामध्ये सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव संजयकुमार झांबरे यांची महामंडळाच्या विद्या सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यापुर्वी कार्यकरणीमध्ये संजयकुमार झांबरे यांनी सह सचिवपदी काम पाहिले होते.त्यांनी आजपर्यंत महामंडळात केलेल्या उठावदार कामाची दखल घेऊन त्यांना महामंडळाने पुन्हा विद्या सचिवपदी संधी देण्यात आली.यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष अमृत पांढरे यांची कोल्हापूर विभागाच्या अध्यक्षपदी निवडही जाहीर करण्यात आली. 
त्याचबरोबर यावेळी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कार्याध्यक्षपदी,तानाजी माने (सोलापूर) यांची अध्यक्षपदी,नंदकुमार सागर (पुणे) यांची सचिवपदी अश्या इतरही निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या.
यावेळी बाळासाहेब जाधव,अरविंद कदम,संतोष नाईक        विवेक कुंडले,बाजीराव पाटील,संभाजी पाटील सह             पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.