NC Times

NC Times

लढा विचांराचा ,आधुनिकतेतही संस्कृती जोपासण्याचा, टिकवण्याचा एक विचार घरातील प्रत्येकाच्या आईच्या पदरासाठी , एक विचार प्रत्येक आई,ताई आणि बाईसाठी पदर आईचा अन् आयुष्याचा


नवचैतन्य टाईम्स वाई (ह.भ.प.प्रा.सौ .सरस्वती ताई भोसले-वाशिवले)-
'पदर' न काना न वेलांटी,न उकार,न मात्रा,
किती साधा, सोपा,सरळ शब्द
लग्न झाल्यावर डोक्यावर चा पदर शालीनतेचे दर्शन देतो.
बाळ झाल्यावर ,बाळाची भूक शमविण्यासाठी संरक्षक ठरतो. अंथरूणावर गेल्यावर पांघरून बनतो,एखाद्याचा पती गेल्यावर तोच पदर ती बाई कमरेला खोचून संकटाशी दोन हात करते,
परमेश्वराकडे कुटुंबाकरता मागणे मागताना पदर पसरते,मिळालेले दान ओटीत घेतानाही पदर पसरते,

खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली
आणि मग नऊ महिन्यांनी तिच्या 
पदराची ओळख झाली.

पाजताना तिनं 
पदर माझ्यावरून झाकला,
आणि मी आश्वस्त झाले ...
तेंव्हापासून तो खूप 
जवळचा वाटू लागला

आणि मग तो भेटतच राहिला ... 
आयुष्यभर

शाळेच्या पहिल्या दिवशी 
तो रुमाल झाला

रणरणत्या उन्हात 
तो छाया झाला,

पावसात भिजून आल्यावर 
तो टॉवेल झाला,

घाईघाईत खाऊन खेळायला पळताना 
तो नॅपकीन झाला,

प्रवासात कधी 
तो अंगावरची शाल झाला, 

बाजारात भर गर्दीत कधीतरी 
आई दिसायची नाही
पण पदराच टोक धरून 
मी बिनधास्त चालत राहायचे ...
मग त्या गर्दीत 
तो माझा दीपस्तंभ झाला,

गरम दूध ओतताना 
तो चिमटा झाला,

उन्हाळ्यात लाईट गेल्यावर 
तो पंखा झाला,

निकालाच्या दिवशी 
तो माझी ढाल व्हायचा,

बाबा घरी आल्यावर, 
चहा पाणी झाल्यावर,
तो पदरच प्रस्ताव करायचा ....

छोटीचा रिझल्ट लागला...
चांगले मार्क पडले आहेत
एक-दोन विषयात कमी आहेत, 
पण ...
पण आता अभ्यास करीन असं म्हणतेय..

बाबांच्या संतापाची धार बोथट होताना
मी पदराच्या आडून पाहायचे
हाताच्या मुठीत पदराच टोक 
घट्ट धरून !

त्या पदरानेच मला शिकवलं
कधी - काय - अन कसं बोलावं
 
तरुणपणी जेव्हा पदर 
बोटाभोवती घट्ट गुंडाळला
तेव्हा त्याची खेच बघून 
आईने विचारलंच,
“कोण आहे तो...
  नाव काय??”

लाजायलाही मला मग 
पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला.

रात्री  मैत्रिणींची पार्टी करून आल्यावर ... 
जिन्यात पाऊल वाजताच,  
दार न वाजवता ... 
पदरानेच उघडलं दार.
कडी भोवती फडकं बनून ...
कडीचा आवाज दाबून ...

त्या दबलेल्या आवाजानेच  
नैतिकतेची शिकवण दिली
 
पदराकडूनच शिकले सहजता

पदराकडूनच शिकले सौजन्य

पदराकडूनच शिकले सात्विकता

पदराकडूनच शिकले सभ्यता

पदराकडूनच शिकले सहिष्णुता

पदराकडूनच शिकले सजगता
 

काळाच्या ओघात असेल, 
अनुकरणाच्या सोसात असेल
किंवा
स्वतःच्या "स्व"च्या शोधात असेल,

साडी गेली... 
ड्रेस आला 
पँन्ट आली... 
टाॅप आला
स्कर्ट आला... 
आणि तो ही  छोटा होत गेला,
प्रश्न कपड्याचा नाहीच हो प्रश्न  आहे तो आईपणाचा ,
प्रश्न आहे तो बाईपणाचा , आक्रसत जाऊन , विचारा शरीरशास्त्राला,मानसशास्त्रातील ,ग्रंथातील वाचनाना,कारण जसे वस्त्र, तसेच तुमचे विचार हळूहळू पुरषी कपड्यांच्या मुळे तूमच्या तील बाईपणाचे अस्तित्व च मिटू पाहते पुरुषी  कपडे, 
समाजातील पुरूष वर्ग आज ही स्वतःचा पोशाख  च घालत आहे.
पण स्त्री वर्ग स्वतःचे वस्त्र कि जे आईपण ,बाईपण जपते ते समाजातून हद्पार  करत आहे
गायब होऊ घातलेल्या पदराचा ! आतून टाहो ऐकू येतो का आपल्या ला 
रोजच्या जीवनशैलीतील  वाचवा!!! म्हणानार्या पदराला वाचवा!!!
कारण पदर हे पद नसून , जन्मभराची फक्त आणि फक्त  जबाबदारी आहे . आणि ती जाणीवपूर्वक व नि:स्वार्थपणे - पेलू शकते केवळ आई !

खरं तर - शर्टालाही  फुटायला हवा होता पदर ...
पण खरं सांगू ... शर्टाला तो झेपणार नाही !!!
आज बदलत्या जीवनशैली आणि आधुनिक वस्त्र व सुशिक्षित पणा  च्या  नावाखाली आईचा हा पदर हरवतो आहे का? मनाला  प्रश्न पडतो.कारण आजची आई,ताई,बाई,टिशर्ट आणि पॅंट मध्ये स्वतःला कम्फरटेबल समजत असेल तर पदरवाली' श्यामची आई'  जी श्यामला सांगते बाळा माझा मी पदर पसरते   यावरून तू ये कारण तुझ्या पायाला घाण  लागू नये म्हणून, 
जशी पायाला घाण  लागू नये   याची काळजी घेतोस तशीच काळजी मनाला  घाण लागू नये यासाठी घे हो  कशी मिळेल? अशी' श्यामची आई' कपडे आणि संस्कृती व सभ्यता हा खरंच च मानवाच्या जवळ चा व जिव्हाळा चा विषय आहे का?स्वतःला विचारून च उत्तर द्या
चुकतंय!का कुठे समाजातील  या आपल्या  मैत्रिणींचं
आजीचा,आईचा पदर आठवा,  
परदेशी मालावर बहिष्कार घालणारे स्वातंत्र्य सैनिक, आठवा,
 कुठे आपण केवळ गप्पा मारून देशभक्ती चे धडे गाजवणारे!!!
(ह.भ.प.प्रा.सौ .सरस्वती ताई भोसले-वाशिवले )