NC Times

NC Times

कवठेमहांकाळ मध्ये गुरुपौर्णिमा निमीत्ताने विविध कार्यक्रम,रक्तदान व मोफत आरोग्य शिबीराचा आयोजन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे):-  कवठेमहांकाळ येथील कमंडलू नदीच्या काठावर असलेल्या श्री शिवचिदंबर मंदिरात रविवार दिनांक २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती शिवचिदंबरदास गुरू गोविंद महाराज यांनी दिली.यामध्ये महाआरती,मोफत आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर याचा प्रामुख्याने समावेश आहे. 
याबाबत माहिती देताना गुरू गोविंद महाराज पुढे म्हणाले की रविवार दिनांक २१ रोजी सकाळी ६ वाजता श्रीच्या मुर्तीस महाभिषेक व काकड आरती होणार आहे तर सकाळी ७ वाजता पुन्हा नित्याची आरती होणार आहे.त्याचबरोबर दुपारी ३ वाजता विविध भागातुन येणाऱ्या दिड्यांची 'दिंडी भेट' होणार आहे. तर दुपारी ३.३० वाजता भव्य रिंगण सोहळा पार पडणार आहे.त्याचबरोबर दुपारी ४.३० वाजता पालखी सोहळा होऊन, महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.तर सायंकाळी ५ वाजता मंदिर परिसरात भजनाचा कार्यक्रम होणार आहे तर रात्री ७ वाजता महाआरती होणार आहे. 
      त्याचबरोबर याच दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून मंदिर परिसरातच मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर होणार यामध्ये अगदी तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत.तरी याचा तमाम भाविक भक्तांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.