NC Times

NC Times

सोमवारी पाचेगाव (बु) येथे शिवलीला पाटील यांचे किर्तनाचे आयोजन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/ वार्ताहर(जालिंदर शिंदे)- सोमवार दिनांक २९जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता हभप कै आबासो आनंदा घोडके यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने हभप शिवलीलाताई पाटील यांचे किर्तन होणार आहे.तरी याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन राजमाता प्लास्टिक उद्योग समूहाचे संस्थापक मच्छिंद्र घोडके यांनी केले आहे.यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही केले आसल्याचेही त्यांनी सांगितले.
यानिमित्ताने राहत्या घरी सकाळी १० वाजता प्रतिमा पूजन,पुष्पवृष्टी तदनंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.त्याचबरोबर दुपारी १२ वाजता हभप रावसाहेब यादव महाराज करंजे (ता खानापूर) यांचे किर्तन होणार आहे.तसेच सांयकाळी ७ वाजता न्यु इंग्लिश स्कूल पाचेगाव (बु) च्या मैदानावर हभप शिवलीलाताई पाटील यांची किर्तन सेवा होणार आहे.तरी याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.