NC Times

NC Times

माझी उमेदवारी जनतेकडूनच जाहीर,आमदार की मोठ्या ताकतीने लढणार - डॉ शंकर (दादा) माने


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- समोरील उमेदावारांची उमेदवारी ही त्यांचे नेता कींवा पक्ष जाहीर करेल पण माझी उमेदवारी ही आज जनतेनेच जाहीर केली आहे.हे आजची लक्षणीय उपस्थितीच सांगत आहे.त्यामुळे येणारी विधानसभा ही पुर्ण ताकतीने लढणार असल्याचे विचार डॉ शंकरदादा माने यांनी व्यक्त केले ते कवठेमहांकाळ येथील नाट्यगृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी बहुसंख्येने बसपाचे पदाधिकारी व असंघटीत कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 यावेळी डॉ शंकरदादा माने यांच्या सामाजिक चळवळीतील कामाला वीस वर्षे पूर्ण झाल्या बद्दल बसपा कार्यकर्त्यासह गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या वतीने त्यांच्या नगरी सत्कार करण्यात आला.तदनंतर लगेचच कार्यकर्ता चिंतन मेळावा पार पडला.यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.यावेळी तासगाव- कवठेमहांकाळ तालुक्यातून सर्वसामान्य लोकांनीही मोठी गर्दी केली होती.
 यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की मला संपूर्ण जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना सामाजिक चळवळीमध्येही काम करता आले.त्याला आज वीस वर्षे पूर्ण होत आहेत.म्हणूनच गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या वतीने आज नागरी सत्कार होत आहे.कार्यकर्ता चिंतन मेळावाही होत आहे.यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो सर्वसामान्य जनतेने गर्दी केली आहे. 
यावेळी उपस्थित गर्दीच्या साक्षीने डॉ शंकरदादा माने यांनी आपण तासगांव-कवठेमहंकाळ मतदारसंघांतुन आमदारकी लढणार असुन मला व्होट व त्याचबरोबर नोटही देण्याचे आवाहन केले त्याला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी विचार पटावर येऊन भरभरून पैशाचा वर्षाव केला.काही कार्यकर्त्यांनी तर नोटांचे हारच घातले.तर काही कार्यकर्त्यांनी आपला एक एक पगार आणि ज्या गोरगरिबांना डॉ माने यांनी पेन्शन केल्या आहेत त्यांनी एक,एक पेन्शनच दिली. आणि आता आम्हाला बदल हवा आहे आम्ही मतदारसंघातील घराणेशाही मोडून काढू असा विश्वासही दिला.
डॉ शंकरदादा माने म्हटल्यानंतर मतदार संघातील सामान्यसाठी गोरगरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी अहोरात्र धावून जाणारा कामाचा माणूस म्हणून ओळखले जातात.या सत्कार प्रसंगी बांधकाम कामगारांना सात लाख रुपये पर्यंतच्या दवाखान्याचे कार्ड वाटप करण्यात आले. मेडिकल टेस्ट करून उपचार करण्यात आले.त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांच्या अनेक योजनाचेही वाटप करण्यात आले.
 ना आमदाराचा ना खासदाराचा मुलगा निवडून आणणार आता  सर्वसामान्य जनता सर्वसामान्यांचा मुलगा या घोषणेने तर संपूर्ण परिसर दणाणूनच गेला
सभेसाठी डॉ शंकरदादा माने,शहाजी केंगार,सिद्धनाथ माने,विशाल कांबळे,शुभम चव्हाण,विशाल कर्पे,सुनील        खोत, संतोष वानखडे,प्रशांत आठवले,वैभव शिंदे,प्रताप खोत,जालिंदर मोहिते,सुभाष मराठे,गौतम कांबळे,भानुदास आठवले,गणेश सुर्वे,संजय थोरवत,अमोल वाघमारे,शुभम भोसले,नाथा आठवले,साहिल आठवले,सविता माने,संजना आठवले,प्राची लांडगे,काजल आठवले,राखी शिंदे,उज्वला धोत्रे,जयश्री फाळके,सुनिता लोंढे, प्रिया धोकटे,अर्चना        मोहिते,नंदा यमगर,साक्षी कांबळे,जोया वारे, सुषमा लोंढे,    सायली साठे,श्रीदेवी खोत,प्रियंका पोतदार,शालन निमग्रे,      कविता पाटील,रेखा कांबळेसह पदाधिकारी व कार्यकर्ते      उपस्थित होते.सविता माने यांनी आभार मानले.