NC Times

NC Times

धावडवाडी ता. आटपाडी येथे मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)- धावडवाडी मध्ये पूर्वीपासून हा मोहरमचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे यांचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात आजरोजी मोहरमचा सण मोठ्या उत्साहात ताज्या विसर्जन करण्यात आले आहे धावडवाडी गावामधून ताज्या निघत घोडकुर येथे विसर्जन होत असतो हे दरवर्षीप्रमाणे हा मोहरमचा कार्यक्रम धावडवाडी गावामध्ये बऱ्याच वर्षापासून अखंडीत परंपरा चालू आहे लोकांचाही या मोहरम सणाचा अतिशय उत्साह लोकांमधून दिसून येत होता धावडवाडी गावातील महिला व पुरुष या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आज सायंकाळी ताज्या विसर्जन करण्यात आले.