NC Times

NC Times

गुरुपौर्णिमेला कवठेमहांकाळ येथील श्री शिवचिदंबर मंदिरात विविध भागातुन दिंड्या येणार,कार्यक्रमाची जय्यत तयारी


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक २१ जुलै या गुरुपौर्णिमे दिवशी कवठेमहांकाळ येथील कमंडलू नदी तीरालगत असणाऱ्या श्री क्षेत्र चिदंबर महास्वामी मंदिरात विविध भागातून आबालवृद्धसह पायी दिंडी येणार असून यामध्ये श्री क्षेत्र दरीबडची ( ता जत),श्री क्षेत्र मळणगाव (ता कवठेमहांकाळ),क्षेत्र मणेराजुरी (ता तासगाव),श्री क्षेत्र सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील दिंड्याचा समावेश असून यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आसल्याचे सोहळा उत्सव समितीचे सर्वस्वा चिदंबरदास गुरू गोविंद महाराज यांनी सांगितले.
यावेळी बोलताना चिदंबरदास गुरू गोविंद महाराज पुढे म्हणाले की सदर दिंडी सोहळ्यात आबालवृद्धसह भाविक भक्त टाळमृदंगाच्या तालात भजन,कीर्तन,नामस्मरणसह हासतनाचत ही दिंडी कवठेमहांकाळ शहरात येणार असून,येथील श्री शिवचिदंबर मंदिरात मुर्ती पुजन, आरती,भजन,कीर्तन,पुष्पवृष्टी सह शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे तर कार्यक्रमाची सांगताही महाप्रसाद वाटपाने होणार आहे.