NC Times

NC Times

कृषीकन्यांकडून वैज्ञानिकरित्या गोठा स्वच्छतेचे प्रात्यक्षिक


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे):-ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डॉ डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी चुये (ता करवीर) येथे वैज्ञानिकरित्या गोठा स्वच्छतेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.जनावरांच्या निवास्थानांतील शेण,मुत्र,धुळ,पेंढा,चारा इत्यादी काढून टाकून फरशी दररोज स्वच्छ पाण्याने धुवून गोठा कसा स्वच्छ केला जातो याचे प्रात्यक्षिक दाखविले. 
       प्राचार्य डी एन शेलार,समन्वयक डॉ एस एम घोलपे,कार्यक्रम अधिकारी प्रा एम एन केंगरे व के एस कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी बोनगे,निर्जला देसाई,अंकिता माने,प्राजक्ता काकडे,श्रुतिका शिवथरे,सई पाटील कृषीकन्यांनी सहभाग नोंदवला.