NC Times

NC Times

परफेक्ट इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे /वार्ताहर(जालिंदर शिंदे)- परफेक्ट इंग्लिश मिडीयम स्कूल कुची (ता कवठेमहांकाळ) येथे गुरुपौर्णिमा व मातृ-पित्र पाद्यपूजान सोहळा विविध कार्यक्रमासह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी पालक,शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी पत्रकार जालिंदर शिंदे व संचालक वसंत पवार यांच्या संयुक्त हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.तदनंतर पौराहात्या संतोष कुलकर्णी अजंनी (ता कवठेमहांकाळ) यांनी उपस्थितांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगुन मुलांना पालकांचे व शिक्षकांचे पाद्यपूजान करण्यास उपकृत केले.त्यानुसार विद्यार्थ्यांनीही आईवडील व शिक्षकांना गुरु स्थानी मानुन पाद्यपूजान करुन ओवाळणी केली.पालकांनाही आपण यावेळी उपकृत झाल्याचे समाधान वाटले. 
  तदनंतर काही शिक्षक व विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमे विषयावर आधारित नाटीका व गीते सादर केली.याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय शिंदे,सचिव नानासाहेब पाटील,प्रिन्सिपॉल सौ रुपाली पाटील,संचालक वसंत पवार,महेश माळी,शिक्षिका सर्वश्री स्वाती पाटील,प्रमिला भोसले,रेखा चव्हाण,वैशाली जाधव रिमा सोरटे,अनिता निकम,अदिती पाटील,वैशाली माने,        संगीता शिंदे,पुजा शिंगारे,अश्विनी पाटील,रुपाली ओलेकर  ,प्रियांका देसाई सह विद्यार्थी,शिक्षक,पालक,ग्रामस्थ मोठ्या   संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार प्राचार्या सौ रुपाली पाटील यांनी मानले.