NC Times

NC Times

चूये येथे कृषीकन्यांकडून निंबोळी अर्कचे प्रात्यक्षिक


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- डॉ डी वाय पाटील महाविद्यालयाच्या कृषीकन्यांकडून चुये (ता करवीर) येथे ५ टक्के निंबोळी अर्कचा योग्य वापर करून सेंद्रिय पद्धतीने किड नियंत्रण कसे करावे याचे योग्य प्रात्यक्षिक शेतकर्यांना दाखविण्यात आले.यावेळी ग्रांमस्थासह शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       उडीद,तुर,सोयाबीन,मुग या पिकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये निंबोळी अर्कचे म्हत्व यावेळी सांगण्यात आले.५ टक्के निंबोळी अर्क फवारल्याने पिकाच्या पानावर चमक येते त्याचबरोबर पानांची व फळांची किडरोगांना प्रतिकार करण्याची क्षमताही वाढते असे हे बहुउपयोगी निंबोळी अर्क कसे तयार करावयाचे याचे प्रत्येक्षिक कृषीकन्यांनी उपस्थित बळीराजांना दाखविले. 
     यावेळी उपस्थित कृषीकन्यां सर्वश्री अंकिता माने,प्राजक्ता काकडे,श्रुतिका शिवथरे,सई पाटील,निर्जला देसाई,वैष्णवी बोनगेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर प्रात्यक्षिकासाठी प्राचार्य डी एन शेलार,प्रा डॉ एस एम घोलपे,प्रा आर आर पाटील,प्रा एम एन केंगरे यांचे विषेश मार्गदर्शन लाभले.