NC Times

NC Times

भाजप पक्षाने संधी दिल्यास जत विधानसभा ताकतीने लढविणार- डॉ. सार्थक हिट्टी


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ /प्रतिनिधी(विजय चौगुले)-भारतीय जनता पार्टी  वैद्यकीय सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष व जत पूर्व भागातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सार्थक दादा हिट्टी जत विधानसभा लढवण्यास इच्छुक असून भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास जत विधानसभा मोठ्या ताकतीने लढविणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले
वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजसेवा करीत आहेत तसेच डॉ. शेखर हिट्टी यांचा वैद्यकीय व्यवसायाचा वारसा सक्षमपणे पार पाडत आहेत ,भागीरथी उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले आहेत  व लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत 
जत पूर्व भागात डॉ.सार्थक दादा हिट्टी युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून दहा वर्षांपासून विविध ठिकाणी पाणपोई उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ,भागीरथी हिट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक मोफत महाआरोग्य शिबिरे आयोजित करून मोफत औषधे वाटप केले आहेत, ‌राजकारणात कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वकर्तुत्वावर उभारलेले नेतृत्व .जत तालुक्यात भाजपचे अद्यावत व सुसज्ज असे जनसंपर्क कार्यालय उभा केले आहे, भारतीय जनता पक्षामध्ये पाच वर्षाहून अधिक काळ भाजप पक्षात एकनिष्ठ व निस्वार्थपणे काम करीत आहेत. पक्षश्रेष्ठी व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सोबत जवळचे संबंध तसेच सर्वपक्षीय नेत्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत, गोरगरीब व युवक वर्गासाठी जत तालुक्यामध्ये पहिले मोफत अद्यावत व सुसज्ज असे वाचनालय उभे केले आहे.
जत तालुक्यातील दुष्काळी भागात पाणी चळवळीसाठी त्यांनी भिक मांगो पाणी आंदोलन व तालुक्यातील पाणी प्रश्नावर सातत्याने पुढाकार घेतला आहे.
लिंगायत व बहुजन समाजातील लोकप्रिय युवा चेहरा म्हणून सर्व स्तरातून त्यांना पसंती मिळत आहे,सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे, प्रशासकीय अधिकाऱ्या सोबत मैत्रीपूर्ण जवळचे संबंध आहेत,सर्वसामान्य जनतेची विविध माध्यमातून जनसेवा केली असल्यामुळे जनसामान्य जनतेशी नाळ जोडली गेली आहे, डॉ.सार्थक दादा हिट्टी युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी निर्माण केली आहे, मित्तभाषी, साधी राहणीमान, उच्चशिक्षित  या सर्व गुणांमुळे लोकांमधून त्यांना पहिल्या क्रमांकाची पसंती मिळत आहे ,येणाऱ्या काळामध्ये जत तालुक्याच्या विकासासाठी रोजगारसाठी कट्टीबद्ध राहणार आहेत, समाजसेवेतून सामाजिक परिवर्तन करीत असताना भाजप पक्षाने जत विधानसभेची संधी दिल्यास सर्व ताकतीने लढविणार असल्याचे सांगितले