NC Times

NC Times

प्रेम म्हणायचं की श्रीमंतीचा माज? पैशांला तुडवत तरुणी चालतेय पुढे


प्रेम अंधळं असतं, त्यामुळे प्रेमात लोकं वेडी होतात असं म्हणतात. पण या प्रकाराला खरंच प्रेम म्हणायचं की ठार वेडेपणा असा प्रश्न लोकांना पडलाय. कारण एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी चक्क नोटांची बंडलं जमिनीवर टाकली आणि त्यावर पाय देऊन ही तरुणी चालताना दिसत आहे. खरं तर, हा व्हिडीओ भारतामधील नाही. विदेशातील आहे. पण तरी देखील पैशांचा असा होणारा अपमान पाहून भारतीय नेटकरी मात्र चांगलेच चिढले आहेत. पैशांचा आदर करा असा सल्ला त्यांना देत आहेत.
हा प्रकार पाहून भारतीय संतापले
हा व्हिडीओ Mr.thank.you या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही एक इन्स्टाग्रा रील आहे. यामध्ये तुम्ही एका तरुणीला हेलिकॉप्टरमधून उतरताना पाहू शकता. पण ही तरुणी हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्याऐवजी नोटांच्या बंडलांवर पाय ठेवून चालू लागते. ज्या पैशांसाठी लोकं दिवस-रात्र मेहनत करतात. जे पैसे नाहीत म्हणून लोकं आत्महत्या सुद्धा करतात, ज्या पैशांसाठी लोकं मोठ्यातल्या मोठा अपमान देखील पचवतात. तेच पैसे हे कपल चक्क पायाखाली तुडवताना दिसत आहे. अन् अर्थातच हा प्रकार भारतीयांचा मात्र चांगलीच सटकलेली दिसतेय. कारण आपल्या संस्कृती पैशांना आपण ईश्वराचं स्थान देतो.
 हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची सटकली
https://www.instagram.com/reel/C7vRO1NN8lM/?igsh=Y3UxZmFoaXhoMjI=
कपल दाखवतेय श्रीमंतीचा माज 
हा व्हिडीओ ५५ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून बहुतेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओमध्ये झळकणारं कपल हे सोशल मीडिया इन्फ्लुएंझर आहे. यापूर्वी देखील त्यांनी अशा प्रकारचे व्हिडीओ तयार केले आहेत. या व्हिडीओंमध्ये श्रीमंतीचा आव तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. बहुदा आपली श्रीमंती दाखवूनच तो अधिक पैसे कमवत असावा. पण पैशांना लाथेनं तुडवणं हा प्रकार भारतीयांना काही पारसा रुचलेला नाही. परिणामी व्हिडीओवर प्रतिक्रिया देत अनेकांनी त्याला ट्रोलच केलं आहे.