NC Times

NC Times

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख मा उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांगोळेत वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने  नांगोळे (ता कवठेमहांकाळ) येथील आदर्श विद्यामंदिर व जिल्हा परिषद शाळेत शिवसेना कवठेमहांकाळ तालुका उपप्रमुख  दिलीप गिड्डे यांच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना प्रणीत तालुका गुंठेवारी समीतीचे अध्यक्ष रामदास सावंत होते. 
यावेळी शिवसेना प्रणीत गुंठेवारी विकास समितीचे तालुका अध्यक्ष रामदास सावंत यांनी सर्वांच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन,त्यांनी कोरोना महामारीच्या संकटात महाराष्ट्रातील जनतेला वाचविण्यासाठी अगदी आदर्श काम केले होते याची आठवण करून दिली.त्याचबरोबर प्रत्येक संकटाना सामोर जाणारेच कुटुंबप्रमुख आसतात तेच काम उध्दवजी ठाकरे करत असल्याचे सांगितले.यावेळी तालुका उपप्रमुख दिलीप गिड्डे यांनीही उध्दव साहेबांच्या कामचे कौतुक करताना त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्वांनीच योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले. 
   
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी तालुका उपप्रमुख दिलीप गिड्डे,शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे तालुका अध्यक्ष रामदास सावंत,शिवशक्ती वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष सागर शेजाळ,उपजिल्हाप्रमुख एकनाथ पवार,तालुका प्रमुख अजय मोरे,युवानेते गणेश चव्हाण,संभाजी हुबाले,आदर्श विद्यामंदिर नांगोळे मुख्याध्यापक तुकाराम मासाळ,दिलीप सुतार, हनुमंत मासाळ,दादासाहेब मासाळ,जाधव मॅडम,जि प शाळा मुख्याध्यापक तानाजी काशीद,जानकर सर,माजी सरपंचअनिल गोंधळेसह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.