NC Times

NC Times

शरीर डिटॉक्स करण्यासाठी या पदार्थाचा रोजच्या आहारात समावेश करा

 
नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- काही वेळा आरोग्य खाण्याच्या सवयीमुळे ही तब्येत चांगली नसते कारण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी फक्त योग्य आहाराची व जीवनशैलीची गरज नाही तर वेळेवर शरीर शुद्धीकरण डिटॉक्स करणे देखील फार आवश्यक आहे शरीर डिटॉक्स केल्याने विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर ही दीर्घकाळ निरोगी राहते अनेक वेळा चुकीचा आहार आणि अनियमित जीवनशैलीमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. त्या शरीरात साचून राहिलेल्या विषारी द्रव्यामुळेच त्यामुळे आजार होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो अशावेळी शरीराला डिटॉक्स करणे आवश्यक होते शरीर डिटॉक्स करण्यासाठी काही पदार्थ वापरू शकता हे पदार्थ खाल्ल्याने शरीर निरोगी होते आणि विषारी पदार्थ ही सहज निघून जातात चला जाणून घेऊया अशा पदार्थाविषयी जे शरीर डिटॉक्स करतात
लिंबू - लिंबू मध्ये सोडियम पोटॅशियम लोह आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळते लिंबाचा रस शरीराच्या अनेक समस्या सहज दूर करतो लिंबाचा रस शरीर डिटॉक्स करण्यासाठी वापरला जाऊ शकतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास सोबतच लिंबाचा रस शरीरातील विषारी पदार्थ ही सहज काढून टाकतो शरीर डेटॉक्स करण्यासाठी दररोज सकाळी लिंबू पाणी प्या
आले- आले शरीरासाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये सोडियम पोटॅशियम प्रोटीन आणि विटामिन सी मुबला प्रमाणात आढळते याच्या वापराने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते यामुळे पोटाचे अनेक समस्या सहज दूर होतात ते वापरण्यासाठी आले चहा मध्ये टाकून प्यावे
फुलकोबी - कोबी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे याच्या वापराने शरीर डेट ऑफ होण्यास मदत होते कोबीमध्ये भरपूर फायबर असते जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते कोबीमुळे पोट हे निरोगी राहते हे भाजी किंवा कोथिंबीर द्वारे वापरले जाऊ शकते
नारळ पाणी - नारळाच्या पाण्याच्या सेवनाने ही शरीर डिटॉक्स करता येते
हायड्रोजन युक्त पाणी- हायड्रोजन हा अतिसूक्षम व अति शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट आहे हायड्रोजन युक्त पाणी नियमितपणे पीत राहिल्यास शरीर डिटॉक्स होत राहते