NC Times

NC Times

कुची ता.कवठेमहांकाळ येथे बेंदूर बैलपोळा सण मोठ्या उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी        (जगन्नाथ सकट)-    सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे बेंदूर (बैलपोळा)सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. सणासाठी सजवलेल्या बैलांची गावात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला‌ कुची गावातील प्रसिद्ध बैलप्रेमी ओळखले जाणारे मारुती नारायण जाधव हे गेले अनेक वर्षे बैलांना पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळत आहेत. त्यांनी खिलारी व शर्यतीच्या बैलांना जोपासण्याचा छंद बाळगला आहे कुची गावात बैलांची संख्या कमी असली तरी बैलप्रेमी मारुती नारायण जाधव यांच्या गोठ्यात नेहमी बैलांची संख्या चांगली आहे.ते प्रतिवर्षी बैल पोळ्या दिवशी बैलांना चांगल्या पद्धतीने सजवून सजवलेल्या बैलांची धुमधडाक्यात वाजत गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढतात.त्यासाठी ते हजारोंचा खर्च करतात बैलाप्रमाणेच ते सांभाळ करतात.बैलपोळ्या दिवशी सर्व जनावरांना सजवून त्यांच्यासाठी नवीन साहित्य आणून त्यांचे कुटुंब पूजा करतात.ही परंपरा त्यांनी जोपासली आहे.
कुची येथील मारुती नारायण जाधव यांच्या बैलांची बैलपोळ्यानिमित्त निघालेली भव्य मिरवणूक कुची गावच्या नागरिकांना एक पर्वनीच ठरली आहे.   
                         ‌