NC Times

NC Times

पावसाळ्यात रानभाज्या खा आणि ठणठणीत राहा; रानभाज्या खाण्याचे मोठे फायदे


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर /जालिंदर शिंदे :- सध्या कवठेमहांकाळ तालुक्यात जेमतेम पण बर्यापैकी पावसाळा सुरू आहे.त्यामुळे जिकडे तिकडे हिरवळ दिसू लागली आहे.पिकेही चांगलीच तरारली आहेत.रानात रानभाज्यांचीही चांगल्याप्रकारे उगवण (निर्मिती) झाली आहे.या रानभाज्या पावसाळ्यात जुन ते सप्टेंबर पर्यंत सर्वत्र आढळतात.यामध्ये कंद,फुल,शेंगा,पालेभाज्यांचा समावेश असतो.काही भाज्या तर या केवळ पावसाळ्यातच मिळतात आणी सप्टेंबर पर्यंत या प्रत्येक भाज्यांचा हंगाम हा वेगवेगळा असतो.त्यामुळे आवडीने रानभाज्या खाणार्यांसाठीची ही एक पर्वणीच सुरू झाली आहे. 
या रानभाज्या खाल्ल्याने आरोग्य तर चांगले राहतेच.त्याचबरोबर शरीरास पौष्टिक आहारही मिळतो. रानभाज्या या खते,औषधे विरहित असल्याने नैसर्गिक शुद्ध आसतात व शरीरास चांगल्याच पूरक ठरतात.कालमानानुसार दिवसेंदिवस शेतातून या रानभाज्या नामशेष होत असल्या,तरी कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात आजही रानभाज्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रानभाज्या या आरोग्यदायी असल्याने दररोजच्या आहारात रानभाज्या घेणे महत्त्वाचे आहे. वा आरोग्यासाठी रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर असणे गरजेचा आहे. 
 निरोगी आरोग्याला रानभाज्यामुळे पोषक सर्व घटक मिळत असल्याने पालेभाज्या दैनंदिन आहारात असणे गरजेचे आहे.रानभाज्या खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते,शरीराला पोषक घटकही मिळतात. 'रानभाज्या खा आणि ठणठणीत राहा' असे बोलले जाते.त्याप्रमाणेच त्यातीलच काही कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात प्रामुख्याने आढळणार्या काही रानभाज्या....... 
१) 'तांदुळजा' ही एक गावाकडची लोकप्रिय अशी रानभाजी आहे.याभाजीमुळे शरीराला 'सी' जीवनसत्त्व मिळावे म्हणून तांदुळजाची भाजी खावी असे सांगितले जाते.जर कोणाला गोवर,कांजण्या,आल्या किंवा खूप ताप आला तर शरीरातील उष्णता कमी करावयास तांदुळजा रानभाजी ही उपयुक्त ठरते.
२)'अंबाडी' च्या भाजीत मोठ्या प्रमाणात कॅल्शियम,फॉस्फरस, लोह,झिंक,जीवनसत्त्व 'अ' 'क' अशा पोषक घटकांसह खनिजांचा उत्तम स्रोत आहे.उत्तम प्रमाणात लोह आणि फॉलिक अँसिडच्या उपलब्धतेमुळे रक्तवर्धन होते. डोळे,केस,हाडांसाठी तसेच रक्तदाब नियंत्रणासाठी ही भाजी मोठी उपयुक्त आहे.
३) 'माठाची भाजी' :- थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणातही नैवेद्य दाखविण्यासाठी हीचा वापर केला जातो.काही लोक याच भाजीला  'माठला'  ही म्हणतात.
५) पाथरी : ही रानभाजी शेतात सहज कुठेही उपलब्ध होते. खाण्यासाठी थंड असते.पित्ताचा त्रास कमी होऊन आराम मिळतो. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.आरोग्यासाठी फायदेशीर अशी ही भाजी आहे.
) 'घोळ' ही भाजी तालुक्यात सर्वच भागात आढळून येते.ही भाजी थंड व पचनक्रियेसाठी खूप उपयोगी ठरते.
अश्या अनेक प्रकारच्या रानभाज्यांची सध्या रानात रेलचेल दिसून येत आहे.रानभाज्यांसह इतर पालेभाज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पौष्टिक घटक असतात.जीवनसत्त्वांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.त्यामुळे दैनंदिन आहारात पालेभाज्यांसह रानभाज्या खाणे हे केव्हाही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.