NC Times

NC Times

खरसुंडी येथील कृष्णा रामा गुरव आश्रम शाळेच्या वतीने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे वाढदिवस उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे. यांच्या वाढदिवसानिमित्त खरसुंडी येथील "श्री जोगेश्वरी" शिक्षण प्रसारक संस्थेच्या 'कृष्णा रामा गुरव' आश्रम शाळेमधील मुला-मुलींना खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आटपाडी तालुकाप्रमुख श्री.शेखर (भाऊ) निचळ, संस्थेचे संचालक आमचे मार्गदर्शक श्री.किशोर पुजारी सर, सचिन गुरव, निलेश गुरव, जुने शिवसैनिक विभागप्रमुख मोहन शिंदे, निवास वाडेकर, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.