NC Times

NC Times

राष्ट्रीय स्वराज्य सेनेच्या वतीने विधानसभेला २८८ उमेदवार देणार - ॲड श्रीहरी बागल राष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्य सेना


नवचैतन्य टाईम्स दहिसर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात विधानसभेच येत्या दोन महिन्यात निवडणूका पार पडणार असून २८८ उमेदवार राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे उमेदवार उभा करुन निवडणूक लढवणार असल्याचे मत ॲड श्रीहरी बागल यांनी पत्रकार बैठकीत घोषणा केली असुन संघर्ष योध्दा मा .श्री मनोज दादा जंरागे पाटील यांना व सकल मराठा समाजास विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी जाहीर आवाहन ही यावेळी करण्यात आली
राष्ट्रीय स्वराज्य सेना ( राजकीय पक्ष) दहिसर कार्यालयात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील जिल्हा अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित झाले होते यावेळी सर्वानुमते असे ठरले की येऊ घातलेली विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन निवडणूक लढवायची राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांत बहुसंख्य मराठे पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याने मराठा समाजाच्या मताचे विभाजन होऊ नये म्हणून संघर्ष योध्दा श्री मनोज जंरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुक लढवायची.व या वेळेस आपले धनगर व इतर समाजाचे ही सहकार्य घेऊन विधानसभा निवडणुकीस ताकतीने सामोरे जायचे ठरले.राष्ट्रीय स्वराज्य सेना हा निवडूक आयोगाकडे रितसर  २०१८-१९ ला पक्षाने आयोगाकडे नोंदणी केली  असुन विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी आपण आयोगाला निवडणूक चिन्हाची हि लेखी मागणी केली असल्याने लवकरच निवडणूक चिन्ह ही भेटेल .मराठा अध्यक्ष म्हणून संघर्ष योध्दा मनोज जंरागे पाटील यांच्या पाठिंब्यावर आपण एकत्रपणे कोणाला पाडण्यापेक्षा आपण एकत्र विधानसभा निवडणुक महाराष्ट्रात एकत्र लढवुन मराठा उमेदवार भरघोस मतांनी विजयी करुन विधानसभेत आपलेच २८८ मराठा आमदार पाठवुन आपले हक्काचे मराठा आरक्षण घेऊ असे पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. एकत्र तर सर्वत्र. एक मराठा कोटी कोटी मराठा..एकच मिशन मराठा आरक्षण असा नारा देत सदर परिषदेची सांगता झाली.  
- ॲड. श्रीहरी बागल 
राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना Register by ECI ( मराठा राजकिय पक्ष)