NC Times

NC Times

पुण्यापासून फक्त ३० किमी अंतरावर असलेला सुंदर कुंडमळा धबधबा व्हिडीओ एकदा पहाच

 
सध्या पावसाळा सुरू आहे. लोक वीकेंडला घराबाहेर पडत आहे. नदी, धबधबे, झरे, तलाव इत्यादी निसर्गरम्य ठिकाणी भेट देताना दिसत आहे. तुम्ही सुद्धा वीकेंडला फिरायला जायचा विचार करत आहात का? जर हो, तर आम्ही तुम्हाला एक उत्तम जागा सांगणार आहोत. पुण्यापासून फक्त ३० किमी अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणजे कुंडमळा. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुंडमळा विषयी सांगितले आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला खूप सुंदर धबधबा दिसेल. व्हिडीओमध्ये एक तरुण या जागेविषयी माहिती सांगताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सुंदर मंदिर दिसेल आणि या मंदिराच्या शेजारी सुंदर धबधबा दिसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पुण्यातील मावळ तालुक्यात असलेले कुंडमळा धबधबा दरवर्षी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. बेगडेवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळील कुंडमळा हे एक छोटे गाव आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील धबधबा पाहण्यास सर्व उत्सुक असतात
 व्हिडीओ पहा

 कुंडमळा हे बेगडेवाडी रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दोन किमीवर आहे.”
 या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दरवर्षी भरपूर लोक वाहून जातात पाण्यात उतरून जीव धोक्यात टाकू नये. पाणी कमी जास्त होते. तर एका युजरने लिहिलेय, “बेगडेवाडीमध्ये खुप मस्त ठिकाण आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय,”खूप लोक नाहक मरतात इथे , खळगे जास्त असल्याने अंदाज येत नाही. पाण्यात जाणे धोकादायक” एक युजर लिहितो, “मित्रांनो, फिरायला जात आहात तर काळजी घ्या , पाण्याच्या प्रवाहात जाऊ नका .कधी प्रवाह वाढेल सांगता येत नाही .खूप साऱ्या घटना घडत आहेत आणि या पुढे ही घडतील. त्यामुळे काळजी घ्या ….” अनेक युजर्सनी ही सुंदर जागा असल्याचे लिहिलेय. काही युजर्सनी या ठिकाणी गेल्यानंतर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत.