NC Times

NC Times

कुंडलापुर येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने वसुदा फाऊंडेशनच्या वतीने कुंडलापुर (ता कवठेमहांकाळ) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी सदर वसुदा फाऊंडेशने गरजू विद्यार्थ्यांचा दहावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च मोफत केला जाईल असे जाहीर केले.
        यावेळी शिवसेना नेते प्रसाद रिसवडे,शंकर माने,संतोष पाटील,कुंडलापुर-गर्जेवाडी संयुक्त विकास सोसायटीचे चेअरमन दिपकराव चव्हाण,जेष्ठ नेते राजू (काका) पाटील,विलास शिंदे,दिनकर पाटील,युवक राष्ट्रवादीचे धनाजी पाटील,राहुल जगतापसह विद्यार्थी,शिक्षक,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार 'डी' ग्रुपचे सर्वस्वा दिपक चव्हाण यांनी मानले.