NC Times

NC Times

आवळा खाल्ल्याने कमी होते बॅड कोलेस्ट्रॉल हे पदार्थ हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहेत उत्तम...

 
नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. गुड कोलेस्ट्रॉल आणि बँड कोलेस्ट्रॉल याचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो कोलेस्ट्रॉल वाढणे हा आज काल एक सामान्य आजार आहे ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल शरीरातील रक्तवाहिन्यावर चरबीप्रमाणे जमा होते. ज्यामुळे रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम होतो यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारखी गंभीर आणि जीव घेणी परिस्थिती उद्भवू शकते. शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आहार म्हणजे आपण कोणता आहार घेतो तज्ञाच्या मते आहारात बदल करून  बॅड कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण ठेवता येते त्यामुळे काहीही खाण्यापूर्वी त्याचे शरीरावर होणारे परिणाम माहीत असणे गरजेचे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आवळा बेड कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो का... आवळा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो एनसीबीआयच्या अहवालानुसार उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्ये आवळा खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. आवळ्याचे सेवन शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल एलडीएल कमी करून गुड कोलेस्ट्रॉल एचडीएलची पातळी वाढविण्यात मदत करते. आवळ्याच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण आणि रक्तदाब सुरळीत राहतो ज्यामुळे शरीरातील अनेक ह्रदयविकारांचा धोका कमी होतो तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा कोणत्याही प्रकारे आवळा खाऊ शकता आवळा पावडर पाण्यात घालून पिऊ शकता आवळा रक्तातून चरबी काढून पातळ करण्याचे काम करण्यासोबतच शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उत्तम अन्न आहे यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल ही कमी होते.
लसुन- हेल्थ लाईननुसार उच्च कोलेस्ट्रॉल मध्ये लसणाचे सेवन अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर आहे लसूण रक्ताभिसरण सुधारण्यास सोबतच शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्याचे काम करते.
लाल इष्ट तांदूळ- सामान्य पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत लाल इष्ट तांदूळ म्हणजेच रेड ईस्ट राईस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून वाढवण्यास मदत करते.