NC Times

NC Times

जत शहरासाठी साडे सहा कोटी व पाणी पुरवठा योजना मंजूर होणार- मा. संजयराव कांबळे


नवचैतन्य टाईम्स जत (राजू ऐवळे)- 
जत शहरातील शहरातील विविध रस्ते कामासाठी पाच कोटी रुपये ची मागणी केली आहे त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील सभागृह,  कंपाउंड व सुशोभीकरण यासाठी एक कोटी पन्नास लाख अनुदानाची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजयराव कांबळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे  लेखी केली आहे सदरची मागणी करताना महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांच्या माध्यमातून केली असून सदर कामाबाबत सविस्तर चर्चा होऊन सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर जत शहर व उपनगरातील  समस्या तसेच जत शहर व उपनगरासाठी उपयुक्त असणारी पाणी-          पुरवठ्याची अमृत २ ही  योजना गेले बरेच दिवस झाले प्रलंबित आहे त्या मंजुरी बाबत सविस्तर चर्चा झाली.                                                        मा. संजय कांबळे यांनी मागणी केलेले  रस्ता विकासासाठी निधी व      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील      कंपाऊंड सभागृह व  सुशोभीकरणाला निधी  तसेच पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीबाबत सकारात्मक होकार मिळाला असून या सर्व कामकाजासाठी ताबडतोब मंजुरी देण्याची हमी दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दि.५ मार्च१९३४ रोजी जत येथे आले होते व या ठिकाणी सभा घेतली होती त्याचे पावित्र्य म्हणून निधी मंजूर करून दिला जाईल .यावेळी शिष्टमंडळात आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे सोबत रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजयराव कांबळे जतनगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रमोद हिरवे, तेजस वनकुद्रे इत्यादी उपस्थित होते.