NC Times

NC Times

रत्नागिरी नागपूर महामार्गावर आषाढी दिडींतील भक्तगणाना कवठेमहांकाळ पोलिस सहायता केंद्राकडून मार्गदर्शन व अल्पोउपहाराचे वाटप


नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (जगन्नाथ सकट )-रत्नागिरी नागपूर महामार्ग NHl 166 व महामार्ग पोलीस पुणे परिक्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या आषाढी वारी पंढरपूर येथे पायी दिंडी मोटर सायकल रॅली, सायकल रॅली परिवहन विभाग महामंडळातील कर्मचारी यांना आषाढीवारी च्या अनुषंगाने दिंडीतील लोकांना मार्गदर्शन दि.11/07/2024 रोजी ते दि.13.07/2024 रोजी दरम्यान आम्ही Psi युवराज पाटील श्रेणी पीएसआय शिरसाट सपोफौ पाटील सोबत पोलीस अंमलदार स्टाफसह NHI-166 वरील बोरगाव टोल नाका सांगली दिंडीतील लोकांना महामार्गाच्या डाव्या बाजूने तसेच पांढऱ्या पट्टीच्या आतून दोन लाईनीतून जाण्याचे सूचना देण्यात आल्या तसेच दिंडीतील वारकरी भाविक भक्तांना तसेच वाहनातील पंढरपूर कडे जाणाऱ्या सर्व भाविकांना महामार्ग पोलीस सहायता केंद्र कवठेमहांकाळ यांच्याकडून अल्पोउपहार देण्यात आला तसेच योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
ट्रॅक्टर व इतर वाहन चालक यांना रस्त्याने वाहन चालविताना घ्यावयाच्या काळजी बाबत तसेच दिंडीतील वारकरी यांना रस्त्यावर घ्यावयाच्या काळजीबाबत टोल नाका बोरगाव येथे पोलीस चौकी उभी केली असून तेथे माईक द्वारे महामार्गावरून जाणाऱ्या दिंडीतील वारकरी लोकांना थांबून पुढील प्रमाणे सविस्तर माहिती देण्यात आली भाविकांना रात्रीचा प्रवास टाळणे महामार्गावर कोठेही बसू नये महामार्गावरील रस्ता क्रॉस करू नये महामार्गावर रॉंग साईडने जाऊ नये दिंडीतील वाहनांना तसेच सायकल पाठीमागे रिप्लेटर लाईट लावणे बाबत सूचना देण्यात आल्या.रात्रीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी मुक्काम करावातसेच योग्य सूचना अप्पर पोलीस महासंचालक (वा.) म.रा. मुंबई श्री सुरेश मेखला पोलीस अधीक्षक अरविंद साळवे मुख्यालय पोलीस अधीक्षक लता फड मॅडम पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे प्रादेशिक विभाग पुणे यांच्या आदेशाने योग्य त्या सूचना देण्यात आले तसेच वारकरी
भाविकांना दिंडीसाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.