NC Times

NC Times

रविवारी कुकटोळी येथे विना लाठी-काठी बैलगाडी शर्यती


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)- भवानी देवीची यात्रा व महाराष्टाचे युवानेते रोहितदादा आर आर (आबा) पाटील याचा वाढदिवस अश्या संयुक्त कार्यक्रमा निमित्ताने कुकटोळी (ता कवठेमहांकाळ) येथे भव्य विना लाठी-काठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आसल्याची माहिती माजी सरपंच श्रीकांत हजारे यांनी दिली.सदर बैलगाडी शर्यतीचा शौकीनांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. 
    सदर शर्यती संदर्भात बोलताना श्रीकांत हजारे म्हणाले की या शर्यती रविवार दि १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता कुकटोळी (ता कवठेमहांकाळ) येथील हायस्कूल जवळून सोडण्यात येणार असून सदर शर्यतीतील जनरल गटातील विजेत्या प्रथम क्रमांकाच्या गाडीस माजी सरपंच श्रीकांत हजारे यांच्या कडून १ लाखाचे इनाम देण्यात येणार आहे.तर द्वितीय क्रमांकासाठी कवठेमहांकाळ मार्केट कमिटीचे चेअरमन महेश पवार,काकाश्री अर्थमुव्हर्सचे सचिन वाघमोडे,शिवशक्ती क्रेनचे परशराम उतरे यांच्याकडून संयुक्तरित्या ६१०००/- रुपयाचे इनाम दिले जाणार आहे.तर तृतीय क्रमांकासाठी शिरुर (ता अथणी) चे सरपंच बाळु हजारे व अग्रण धुळगाव (ता कवठेमहांकाळ) येथील राजेंद्रशेठ भोसले यांच्या कडून संयुक्तरित्या ४१०००/- हजाराचे इनाम दिले जाणार आहे तर  'ब' गटातील शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाच्या विजेत्या गाडीस मार्केट कमिटीचे माजी चेअरमन दादासाहेब कोळेकर यांच्याकडून ३१०००/- रुपयांचे इनाम,द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास कुकटोळी विकास सोसायटीचे संचालक नामदेव घोदे यांच्या कडून २१०००/- रुपयाचे इनाम तर तृतीय क्रमांकासाठी अग्रण धुळगावचे माजी उपसरपंच सम्राट भोसले यांच्या वतीने ११०००/- रुपयाचे इनाम दिले जाणार आहे. 
   त्याचबरोबर दुसारा-चौसा गटातील प्रथम क्रमांकासाठी विरेंद्रकुमार कारंडे व विनायक उतरे यांच्या कडून संयुक्तरित्या १५०००/- रुपये,द्वितीय क्रमांकासाठी तासगावचे पमु थोरात यांच्या कडून १००००/- रुपये,तृतीय क्रमांकासाठी हरीपुरचे उद्योजक संजय चौधरी यांच्या कडून ७०००/- रुपये इनाम दिले जाणार आहे.तसेच आदत-गटातील विजेत्यास प्रकाश पाटील,बालाजी भंडारे व आकाश क्रेन कुकटोळी यांच्या कडून अनुक्रमे १००००,७००० व ५००० हजाराचे बक्षीस दिले जाणार आहे.
 सदर बैलगाडी शर्यतीस खासदार अमोल कोल्हे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश (भाऊ) पाटील,कैलासभारती गुरुदत बाळ महाराज,तालुका कॉग्रेसचे संजय (बापू) हजारे,कवठेमहंकाळ मार्केट कमिटीचे चेअरमन महेश पवार, माजी चेअरमन दादासाहेब कोळेकर,युवानेते शंतनू सगरेसह पदाधीकार्यांची उपस्थिती राहणार आहे.