NC Times

NC Times

खंडनाळ ता.जत येथे विहिरीत आढळला चाळीस वर्षीय महिलेचा मृतदेह


नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी(संजय शिंदे)-              खंडनाळ (ता. जत) येथे नातेवाइकांना भेटण्यास गेलेल्या महिलेचा घरापासून जवळच असलेल्या विहिरीत मृतदेह आढळला आहे. इंदुमती पांडुरंग बिराजदार (वय ४० रा. खंडनाळ) असे त्या महिलेचे नाव आहे. बुधवारी (ता. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, नातेवाइकांनी इंदुमती यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत उमदीचे सहाय्यक  पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी तपास सुरू करण्यात आली असल्याचे  सांगितले. घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जत पूर्व भागातील खंडनाळ येथील पाटील वस्तीवर मृत इंदुमती कुटुंबासमवेत राहतात. टेलरिंगचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. काल मंगळवारी रात्री एका नातेवाइकाना भेटायला जातो म्हणून त्या गावी गेल्या होत्या. नातेवाइकांना भेटून रात्री साडेनऊच्या सुमारास घराकडे निघाल्या.
दहा वाजले तरी आई घरी न आल्याने मुलाने फोन केला. पण फोन बंद लागत होता. तिचा रात्री वस्तीवर  आजूबाजूला शोध घेतला असता आढळून आली नाही. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास तिचा मृतदेह पाटील वस्तीलगत एका विहिरीत आढळला. गुरे चारण्यास गेलेल्या व्यक्तीने ही घटना पोलिसपाटील नवनाथ पुजारी यांना सांगितली. पोलिस पाटील पुजारी यांनी उमदी पोलिसांना सदर घटनेची माहिती  दिली असून मृत इंदुमती यांच्या मागे पती, मुलगा, सून, तीन मुली असा परिवार आहे.