NC Times

NC Times

भाऊ,दाजी अन् मेव्हण्यांचाही लाडके होण्याचा मुख्यमंत्र्यांकडे हट्ट,लाडकी बहीण योजनेवरून सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ नव्हे तर महापूरच


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे ):- राज्य सरकारने जाहीर केलेल्या  'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक गमतीजमती सांगणाऱ्या मिम्सने (रील्सने) चांगलाच धुमाकूळ घातला असुन किंबहूना त्याचा महापूर आला आहे.पुरुषांच्या कडून लाडका भाऊ योजनेचीही जोरदार मागणी होऊ लागली आहे. 
  परंतु शासनाच्या जाचक अटीमुळे या लाडक्या बहीणीलाच आपण सावत्र आसल्याचे वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे.लाडका भाऊ योजना,लाडकी बायको योजना,  'लाडका मेहुणा'  योजनेच्याही मागण्या करणाऱ्या गंमतीदार मिम्स (रील्स) मनोरंजक ठरत आहेत.
लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर या योजनेचे सर्वाधिक मिम्स (रील्स) व्हायरल होऊ लागले आहेत.सोशल मीडियावर सर्वाधिक प्रतिसाद मिळवणारी ही शासकीय योजना सध्या ठरली आहे.एरवी शासकीय योजनांची माहिती सोशल मिडियावर फारशी चर्चेला कधी येत नाही.पण या योजनेच्या बाबतीत मात्र अगदी उलटे झाले आहे.पुरुष मंडळीकडून महिलांच्या नावाने योजना सुरू होत असल्याने अगदी जळफळाट व्यक्त करणारे मिम्स (रील्स) पाहण्यास मिळत आहेत.
     लाडका भाऊ योजना का नाही अशी जबरदस्त मागणी केली जाऊ लागली आहे.लाडका भाऊ बेकार आहे त्यांनाच काही तरी पैसे द्यावेत असे संदेश फिरतानाचे दिसत आहेत.लग्नाआधीच एकटा भाऊ तोही बेरोजगार आहे.त्यांची योजनेची मागणी हास्याच्या फवाऱ्यात नेहत आहे.जावयाकडून लाडक्या मेहुण्यासाठी 'लाडका पावणा' योजना सुरू करण्याच्या गंमतीने तर वाचकांची हसता हसता पुरेवाट होऊ लागली आहे.घरात महिलांशी पुरुषांनी सन्मानाने वागावे.कारण आता त्या मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीणी झाल्या आहेत असाही संदेश हास्याची लक्तरे टांगू लागला आहे.
    महिला लाभार्थीच्या संदर्भात तर अगदी तुफानी मिम्स (रील्स) सुरू आहेत.योजनेच्या जाचक अटीमुळे लाडकी बहीण ऐवजी ही 'सावत्र बहीण योजना' करावी  अशा मागणीचाही मीम्स (रील्स) फिरु लागला आहे.नंतर लगेच जाचक अटी शिथिल झाल्याने पुन्हा सावत्र ऐवजी बहीण आता पुन्हा लाडकी वाटू लागली आहे.काही महिलांनी मोफत एसटीसाठी प्रवासासाठी आपले वय वाढवून घेतल्याने आता या बहिणीला योजनाच मिळणार नाही असाही संशोधनापर मिम्स (रील्स)समोर आला आहे.त्यामुळे त्यांची मोठी पंचायत झाल्याचेही समोर आले आहे.