NC Times

NC Times

सगेसोयरे कायदा लागू न झाल्याने आयुष्य संपवतोय, चिठ्ठी लिहून मराठा आंदोलकाचे टोकाचे पाऊल


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-   एककीडे जालन्यात मनोज जरांगेंचे मराठा आरक्षणासाठी लढाई सुरु आहे. तर दुसरीकडे हिंगोलीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एक बळी गेल्याची घटना घडली आहे. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील वडध येथील बालाजी सुधाकर नेव्हल वय वर्ष ३५ या तरुणांनी आरक्षण मिळत नसल्याच्या निराशेत जात, टीव्ही केबल वायरनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवले आहे. काल रात्री उशिराने हट्टा पोलीस स्टेशनमध्ये दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यामधील ही पंधरावी घटना असल्याचे धक्कादाय वास्तव समोर आलं आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बालाजी यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता. आरक्षणासंदर्भात सरकारकडून कुठलाही ठोस निर्णय घेतला जात नाही आपल्या पुढील पिढीच्या लेकरांच्या भवितव्याचे काय होणार चिंतेने बालाजी व्यतीत होते आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचले असे त्यांनी स्व:त चिठ्ठीत लिहले आहे.                                                                    काल रात्रीच्या सुमारास सर्व कुटुंबाने जेवण आटोपल्यानंतर साधारण दहा वाजताच्या दरम्यान त्यांनी लोखंडी खिडकीच्या जाळीला केबल लावून गळफास घेतलाय असा प्रकार कुटुंबाच्या लक्षात आला. घटनेनंतर कुटुंबाने आरडाओरडा केला आणि बालाजीला तातडीने रुग्णालयात नेले,पण डॉक्टरांनी बालाजी यांना मृत घोषित केले. गोविंद नेव्हल यांनी हट्टा पोलिसांना घटनेची माहीती दिली.यावरून हट्टा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. पोलिसांना पंचनामा करताना जीवनसंपवण्याआधी लिहलेली चिठ्ठी सापडली.
 पोलिसांनी रितसर पंचासमक्ष पंचनामा केला असता बालाजी यांच्याकडे एक चिठ्ठी आढळून आली. बालाजी यांनी चिठ्ठीत लिहलंय "मी बालाजी सुधाकर नेव्हल मला दोन मुले आहेत. माझ्या मुलाच्या पुढील शिक्षणाच्या भविष्यासाठी मराठा आरक्षण सगे सोयरे सरकारने माननीय मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले असून सरकारने सगे सोयरे कायदा लागू न केल्याने मी माझे जीवन संपवत आहे "एक मराठा लाख मराठा" अशा पद्धतीचा चिठ्ठीवर मजकूर लिहून त्यांनी आपल जीवन संपवल.
मिळालेली चिट्ठी पोलिसांनी पंचासमक्ष तपासासाठी हस्तगत केली असून आकस्मित मृत्युची नोंद पोलिसांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास जमादार कोकरे यांच्याकडून केला जात आहे. मयत बालाजी यांना दोन मुले पत्नी आई-वडील असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.