NC Times

NC Times

उच्च पगाराची नोकरी सोडली अन् तरुणीनं 'गो' शाळेच्या व्यवसायात उतरली


नवचैतन्य टाईम्स अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्या अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पॅकेजेस मिळविण्याची स्वप्न पाहात असतात. तर काही जण नोकरी सोडून जीवनात वेगळं काहीतरी करण्याचा निर्णय घेत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणीने उच्च पगाराची नोकरी सोडून गोवंश संवर्धनात येण्याचा निर्णय घेतला आहे.
 गो शाळेला माध्यमातून व्यवसायाला सुरुवात
वर्षा संजय मरकड असं उच्च शिक्षित तरुणीचे नाव असून ती अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी या गावची रहिवासी आहे. वर्षाने एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं परंतु पुढे जाऊन तिने नोकरी न करता एका गोशाळा चालु करण्याचा निर्णय घेतला तसेच त्या गो शाळेला उद्योगाचे स्वरूप देऊन ती चांगले उत्पन्न मिळवत आहे.
गायींच्या शेणापासून तयार करते धूप अगरबत्ती
वर्षाने गो शाळेला फक्त गायांच्या संगोपनाचे केंद्र न ठेवता त्याचे व्यवसायात रूपांतर केलं आहे. तिने गाईच्या शेणापासून अगरबत्ती, धूप, जळाऊ पावडर इ. गोष्टी तयार करत आहे. आणि त्याला बाजारात चांगली मागणी असल्याचे देखील वर्षाने सांगितले आहे. यात विशेष म्हणजे दवणा या प्रकाराची अगरबत्ती वर्षा तयार करते. या अगरबत्तीला नाथ संप्रदायात मोठी मागणी आहे. त्यामुळे मार्केटमध्ये तिची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे वर्षाला चांगले उत्पन्न मिळत आहे.
महिलेला कुटुंबाची साथ लाभली
वर्षाने उच्च शिक्षण घेतलं असून तिने चांगल्या ठिकाणी नोकरी  करावी अशी तिच्या आईवडिलांची इच्छा होती. परंतु वर्षाने गो शाळा निर्मिती  करण्याचा हट्ट धरला. आणि वडिलांना तो मान्य करावा लागला. मुलीची जिद्ध आणि प्रामाणिकपणा पाहून वर्षाच्या वडिलांनी उद्योगासाठी पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला. आणि वर्षाचे संपूर्ण कुटुंब काम करत आहे.
वर्षाची व्यवसाय  ठरतेय प्रेरणादायी
दरम्यान , वर्षाच्या या कामगिरीची आजूबाजूच्या परिसरात चांगलेच कौतुक होत आहे. देशी गायींचे संगोपन करत तब्बल दोनशे गायांची गो शाळा वर्षा चालवत आहे. पर्यावरण रक्षण, प्रदूषण निर्मूलन, सकस आहारातून शतायुषी पिढीची निर्मिती व्हावी यासाठीची ग्रामीण तरुणीची ही झेप सार्वत्रिकशा चर्चेचा कौतुकाच विषय बनला आहे.