NC Times

NC Times

पंकजा मुंडेंचा पराभव ग्रामस्थांच्या जिव्हारी, पांगुळ गव्हाण गावात चुलबंद करून अन्नत्यागाला सुरूवात


नवचैतन्य टाईम्स माजलगाव प्रतिनिधी(सुग्रीव कदम)-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची लोकसभा निवडणुकीत काही मतांनी पराभव झाला, मात्र हा पराभव बीडमधल्या पांगुळ गव्हाण  या ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला. पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे निराश झालेल्या ग्रामस्थांनी चुलबंद करून अन्नत्याग सुरू केले आहे. पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 
पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करा, ग्रामस्थांचा एकमुखाने ठराव
पंकजा मुंडे यांचा पराभव बीड जिल्ह्यातील अनेक जणांना जिव्हारी लागलाय आणि त्यामुळे केवळ सोशल मीडियावरच नाही तर प्रत्यक्ष बोलताना सुद्धा अनेक लोकांना हा पराभव पचनी पडताना पाहायला मिळत नाही. अनेकांना असं वाटतं की पंकजा मुंडे यांच्या या पराभवामुळे त्यांचे राजकीय करियर संपुष्टात आले. म्हणूनच पांडुळ गव्हाण येथे गावातील सगळ्या नागरिकांनी एकत्रित येत गावातील मंदिरावत बैठक बोलावली. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं असा ठरवा ग्रामस्थांनी एकमुखाने मांडला.
पाथर्डी शिरूर नंतर परळी बंदची हाक
पंकजा मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरोधात रविवारी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडिया वरती वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्ट फिरत आहेत. यावर पोलिसांनी कारवाई केली असली तरी या संदर्भात सुरुवातीला पाथर्डी शहर बंद करण्यात आलं. त्यानंतर शनिवारी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहर बंद ठेवण्यात आलं होतं आणि आता रविवारी परळी शहर बंद ठेवणार असल्याचा निर्णय हा वंजारी समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
परळी शहरातील लोक हे पोलीस स्टेशनमध्ये जमून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये जे लोक वादग्रस्त पोस्ट करत आहेत त्यांना पायबंद घालण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे.