NC Times

NC Times

प्रा दादासाहेब ढेरे महानिबंध स्पर्धेत तीन लाखाचे मानकरी


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)- :- निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने  आदर्श रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी व मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी घेण्यात आलेल्या मराठी भाषेतील सर्वात मोठ्या महानिबंध स्पर्धेत कवठेमहांकाळ येथील राजर्षी शाहू कला क्रीडा व सांस्कृतिक विचारांच्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा दादासाहेब ढेरे यांनी सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला होता.त्यासाठी त्यांना तीन लाखाचे इनाम जाहीर करण्यात आले होते.या इनामामध्ये रोख पन्नास हजार रुपये व आडीच लाख रुपये किंमतीची विविध पुस्तकांचा समावेश होता.

 सदर पारितोषक वितरणाचा कार्यक्रम कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छात्रपती सभागृह कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी निर्मीती फिल्म क्लब व विचारमंच्याच बालकलाकारांच्या हास्तेच प्रत्येक विजेत्या स्पर्धकांना हे बक्षीस प्रदान करण्यात आले.प्रा दादासाहेब ढेरे यांनाही निर्मिती फिल्म क्लबच्या बालकलाकारांच्याच हस्तेच हे पारितोषिक प्रदान करण्यात आले.यावेळी निर्मिती फिल्म क्लब व विचारमंच्याचे अध्यक्ष अनिल म्हमाने,प्रा शहाजी कांबळे,रुपाताई वायदंडे, विश्वासराव तरटे,हंबीरराव तरटे, डॉ नामदेव मोरे,अरिहंत मिणचेकरसह निर्मिती फिल्म क्लब विचारमंच्याचे विविध पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बक्षीस वितरणा नंतर बोलताना प्रा दादासाहेब ढेरे म्हणाले की निर्मिती फिल्म क्लब व विचारमंच राबवत आसलेले विविध सामाजिक उपक्रम हे अगदी स्तुत्य असुन अश्या कार्यक्रमासाठी भविष्यात आमचे पाठबळ व सहकार्य राहील.यावेळी त्यांनी  बक्षीसापोटी मिळालेली सर्व रोख रक्कम ही निर्मिती फिल्म क्लब व विचारमंच राबवत असलेल्या विविध सामाजिक कामासाठीच ती परत केली.यावेळी शेवटी ॲड करुणा मिणचेकर यांनी आभार मानले.