NC Times

NC Times

घाटनांद्रेत सोन्या-हरण्याची जोडी शर्यतीसाठी सज्ज


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील बैलगाडीच्या शर्यतीचे हौशी शेतकरी मारुती गोरे यांनी बैलगाडीच्या शर्यतीसाठी नव्याने उभ्या केलेल्या सोन्या-हरण्या ही बैलजोडी आता शर्यतीसाठी सज्ज झाली असुन,सदर बैलजोडीची गाडीसह गावातील प्रमुख मार्गावरून सुवाद्यासह व फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.याला गावकऱ्यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला.
अगदी 'हौसेला मोल नसते' असे म्हटले जाते.या उक्तीप्रमाणेच मारुती गोरे यांनी आपली घरची परिस्थितीही अगदीच बेताची असतानाही खर्च करुन बैलगाडीच्या शर्यतीसाठी ही बैलजोडी सज्ज केली आहे.याला त्यांचा मुलगा सरकार गोरे यांचीही मोलाचे साथ लाभली आहे.सध्याच्या या जीवघेण्या महागाईच्या काळात अशी शर्यतीसाठीची बैले सांभाळणे हे  मोठे खर्चीक व आवाहानात्मक काम आहे.तरी हे काम मारुती गोरे यांनी घरची परिस्थीती बेताचीच असताना लिलायपणे पेलले आहे.हे कौतुकास्पद आहे.याचे गावकऱ्यांनीही मोठे कौतुक केले.
सदर बैलजोडीची सुवाद्यासह व फटाक्यांच्या आतिषबाजीत गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.याला गोवकर्यानीही मोठी दाद दिली.यावेळी मारुती गोरे,सरकार गोरे,चंद्रकांत गोरे,काशिलिंग गोरे,कु नम्रता गोरे,अनिल खाडे,अर्जुन शिंदेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.