NC Times

NC Times

नवरदेवाचे प्रेम पाहून नवरीला आले रडू! भर मांडवात केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

 
सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नातेवाईक अन् कुटुंबातील लोक डान्स मजा करताना दिसतात तर कधी नवरदेव नवरी उखाणे म्हणताना दिसतात. कधी लग्नातील मजेशीर किस्से व्हायरल होतात तर कधी भावूक करणारे क्षण कॅमेऱ्यात कैद होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरीसाठी खास डान्स करताना दिसतो. नवरदेवाचा डान्स पाहून नवरी भावूक होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे.                            खालील लिंक ओपन करुन व्हिडीओ पहा                https://www.instagram.com/reel/C7eFrYNtUqv/?igsh=bWZkeWlmaGl3OXFj   व्हिडीओमध्ये नवरी खूर्चीवर बसलेली दिसत आहे तर नवरदेव तिच्यासमोर डान्स करताना दिसत आहे. नवरदेवाच्य आजुबाजूला नवरदेवाच्या बहिणी आणि भाऊ उभे आहेत आणि ते सुद्धा त्याच्याबरोबर सुंदर डान्स करत आहे. नवरी खूर्चीवर बसून नवरदेवाचा डान्स बघत आहे. तिचा चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा असतो. “हे मराठमोळी थोडीशी साधी भोळी” या लोकप्रिय गाण्यावर नवरदेव डान्स करताना दिसतो. त्यानंतर तो नवरीजवळ जातो आणि तिला जागेवरून उठवतो आणि तिच्या समोर डान्स करतो. नवरदेवाने दिलेले सरप्राइज आणि त्याचा प्रेम व्यक्त करण्याचा हटके अंदाज पाहून नवरी थक्क होते आणि ती क्षणात भावूक होते. तिला अश्रु अनावर होतात. त्यानंतर सर्व जण तिच्याजवळ जमतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल तर काही लोकांना त्यांच्या लग्नाची आठवण येईल.