NC Times

NC Times

सेवानिवृत्त माजी सैनिक तथा इन्कम टँक्स अधिकारी मधुकर भोसले यांचे नागजकराच्या वतीने जंगी स्वागत


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)-   सैन्यात अठरा वर्षे देश सेवा करून इन्कम टँक्स अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची नागज तालुका कवठेमंकाळ या गावी आगमन होताच फटाक्याचे आतिषबाजी करुन ढोल ताशाच्या तालावर गावकऱ्यांनी जंगी स्वागत केले तसेच संपूर्ण कुटुंबासह ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा करत नागरी जवान तथा इन्कम टँक्स अधिकारी यांचा सत्कार केला राष्ट्राच्या संरक्षणासाठी अहोरात्र सीमेवर पहारा देणाऱ्या प्रत्येक सैनिका बाबत नागरिकांमध्ये कायमच आधाराची भावना असते त्यांच्या निवृत्तीनंतरही हा भाव कायम असलेला पाहायला मिळतो निवृत्त होऊन आलेले अधिकारी  मधुकर शंकर भोसले त्यांच्याबाबत असाच अभिमान बाळगत येथील नागरिकांनी त्यांचा निवृत्त सोहळा साजरा करून सैनिका प्रती तथा अधिकाऱ्यांप्रती  असलेला आदर व अभिमान व्यक्त केला अठरा वर्षे लष्करी सेवा करुन इन्कम टँक्स अधिकारी पर्यत सेवा बजावुन निवृत्त होवून नागज जन्मभूमीत आल्यानंतर  नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचा उत्साहात स्वागत केले.
या कार्यक्रमास नागज गावचे माजी सरपंच संजय सुर्यवंशी,सुभाष शिंदे,ग्रामपंचायत सदस्य जयसिंग सर्वदे बिईग फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेश शिंदे,नंदिवाले संघटनेचे सर्जेराव देशमुख,नागजचे उपसरपंच अनिकेत  शिंदे पाटील,तसेच नागज गावातील माजी सैनिक संघटनेचे सर्व  सदस्य व पदाधिकारी  ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य उपस्थित होते सुत्रसंचालन अमोल थोरवे यांनी केले तर आभार जयसिंग सर्वदे यांनी केले.