NC Times

NC Times

रांजणी येथील वैभव कुलकर्णी विशेष पुरस्काराने सन्मानित


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- रांजणी (ता कवठेमहांकाळ) येथील सामाजिक कार्यकर्ते व मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कुलकर्णी यांनी आजवर निस्वार्थीपणे सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाज्याच्या वतीने घेण्यात आलेल्या एका भरगच्च अश्या कार्यक्रमात हि हा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन मॅनेजिंग ट्रस्टी गणपती पंचायत संस्थान सांगली यांच्या वतीने या विशेष पुरस्काराने त्यांना स्नमानित करण्यात आले.
वैभव कुलकर्णी यांनी संपूर्ण सांगली जिल्ह्यात युवकांचे मोठे संघटन केले आहे.अनेक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.आपल्या आक्रमक कार्य शैलीनेच ते सर्वत्र परिचित आहेत.गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत,गरजूंना जिवना आवश्यक वस्तूंचे वाटप त्याचबरोबर आरोग्य व रक्तदान शिबीरांचेही त्यांनी वेळोवेळी आयोजन केले आहे.त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सांगली येथील गणपती पंचायतीच्या हॉलमध्ये झालेल्या एका भरगच्च अश्या कार्यक्रमात पेशवे घराण्याचे वंशज पुष्करराजे पेशवे यांच्या हस्ते हा गौरव त्यांना प्रदान करण्यात आला.यावेळी खासदार मेधाताई कुलकर्णी,सांगली संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन,शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (गुरुजी) सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.