NC Times

NC Times

संख्याबळ घटले, टेन्शन वाढले; मोदी, शहांचा बड्या नेत्याला फोन, पाठिंब्यासाठी 'स्पेशल' ऑफर


नवचैतन्य टाईम्स  नवी दिल्ली (प्रतिनिधी)-  लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जोरदार फटका बसताना दिसतोय. भाजपच्या किमान ६० जागा कमी होत आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीत ३०० पार करणाऱ्या भाजपला यंदा २५० चा टप्पा गाठणं अवघड होतंय. भाजपला धक्का बसल्यानं एनडीएच्या संख्याबळावर परिणाम झाला आहे. एनडीए ३०० च्या आसपास जाताना दिसतेय. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपनं सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांच्या नेत्यांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
 आंध्र प्रदेशातील २५ पैकी १६ जागांवर पुढे असलेल्या तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंना सोबत ठेवण्याचे प्रयत्न भाजपनं सुरु केले आहेत. भाजपनं आंध्र प्रदेशात टिडीपीसोबत युती केली होती. राज्यात भाजपला ३ जागा मिळताना दिसत आहेत. भाजप-टिडीपी युतीनं राज्यात चांगली कामगिरी केली. लोकसभेत भाजपला स्वबळावर बहुमत मिळत नसल्याचं जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी टिडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना फोन केले. केंद्रात पुन्हा सरकार आल्यानंतर आंध्र प्रदेशला 'स्पेशल' राज्याचा दर्जा देऊ, असा शब्द नायडूंना देण्यात आल्याचं समजतं.
आंध्र प्रदेशात विधानसभेचीदेखील निवडणूक झाली. ही निवडणूकही भाजप-टिडीपीनं युतीत लढवली. भाजपनं १०, तर टिडीपीनं १४४ जागा लढवल्या. यातील १३४ जागांवर टिडीपी पुढे आहे. तर भाजपकडे १० जागांवर आघाडी आहे. २०१९ मध्ये जगनमोहन रेड्डींच्या वायएसआरसीपीनं राज्यात तब्बल १५१ जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यांना केवळ १२ जागा मिळताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीतही वायएसआरसीपीचा सुपडा साफ होताना दिसत आहे. पक्षाचे उमेदवार केवळ ४ मतदारसंघांत पुढे आहे.