NC Times

NC Times

मोरगाव येथे खरीप हंगाम कार्यशाळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- मोरगाव (ता कवठेमहांकाळ) येथील खंडोबा मंदिरात संभव कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून विधीवतपणे सदर कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी संभव फाउंडेशनचे सहायक सुबोध नार्वेकर यांनी संभव फाउंडेशन संस्थे अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या अभियाना विषयी माहिती दिली.तर कसबे डिग्रज (ता मिरज) येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ सचिन महाजन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मका लागवड विषयी पंचसूत्री सांगून लष्करी अळी व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले.तर कांचनपुर (ता मिरज) येथील मृदाशास्त्र सहायक शैलेश पाटील यांनी यांनी जमीन आरोग्य पत्रिकावरुन खत व्यवस्थापना विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
शेवटी कृषी सहाय्यीका व्ही जी सुदेवाड यांनी खरीप हंगामातील विविध अभियाना विषयी मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित लाभार्थी शेतकरी बांधवांना मका बियाणे व निविष्ठांचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ सचिन महाजन, शैलेश पाटील,तालुका कृषी अधिकारी बिभीषण दडस,कृषी सहाय्यीका श्रीमती व्ही.जी सुदेवाड,संभव फाउंडेशनचे सहायक सुबोध नार्वेकर,विकास गिरमे,सरपंच आशाताई चंदनशिवे,उपसरपंच सचिन काशिद  सह सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावातील विविध पदाधिकारी, लाभार्थी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपसरपंच सचिन काशिद यांनी आभार मानले.