NC Times

NC Times

कडेगाव नगरपंचायत लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात


नवचैतन्य टाईम्स सांगली (प्रतिनिधी)- गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देणेसाठी २४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कडेगाव नगरपंचायतीच्या लिपिका विरुद्ध सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार यांचा भाऊ यांनी खरेदी केलेल्या जमिनीचे गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र देणेसाठी लोकसेवक सागर माळी, क्लार्क, नगरपंचायत कार्यालय, कडेगाव यांनी तक्रारदार यांचेकडे २४,००० रूपये लाच मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.२१.०५.२०२४ रोजी ॲन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक २१.०५.२०२४ रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणीमध्ये लोकसेवक श्री. सागर माळी, क्लार्क, नगरपंचायत कार्यालय, कडेगाव यांनी तक्रारदार यांचा भाऊ यांनी खरेदी केलेल्या जमीनीची गुंठेवारी नियमितीकरण करून प्रमाणपत्र देणेसाठी स्वतःसाठी तक्रारदार यांचेकडे २४,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्या अनुषंगाने लोकसेवक सागर रामचंद्र माळी, वय-३२ व्यवसाय-लिपीक कडेगाव नगरपंचायत कडेगाव, वर्ग-३, यांचेविरुध्द कडेगाव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची कारवाई अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, विजय चौधरी, अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील, दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, ऋषीकेश बडणीकर, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे यांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स ॲप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ९८२१८८०७३७ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.