NC Times

NC Times

कवठेमहांकाळ येथे मतदार नोंदणी विशेष मोहीमेस प्रारंभ - तहसिलदार अर्चना कापसे


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)- :-
निवडणुक आयोगाकडील सुचनेनुसार २८७ तासगांव-कवठेमहांकाळ विधान सभा मतदार संघामध्ये दिनांक १ जुलैच्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार विशेष मोहीम राबणित येत आहे.सदर मोहीमेचा प्रारंभ तहसीलदार अर्चना कापसे यांच्या हस्ते तहसीलदार कार्यालय कवठेमहांकाळ येथे करण्यात आला.या मोहीमेमध्ये नवीन मतदार नोंदणी,मयत मतदार,स्थलांतरीत व गैरहजर मतदार वगळणी इत्यादी कार्यक्रम दिनांक २५/०६/२०२४ ते २४/०७/२०२४ अखेर राबविण्यात येणार आहे.यानुसार विधानसभा मतदार संघामधील प्रारुप मतदार यादी ही दिनांक २५/०७/२०२४ रोजी प्रसिद्ध करणेत येणार आहे.तदनंतर दिनांक २५/०७/२०२४ ते ०९/०८/२०२४ या कालावधीमध्‍ये हरकती व दावे स्विकारणेत येणार असून अंतीम मतदार यादी दिनांक २०/०८/२०२४ रोजी प्रसिध्‍द करणेत येणार आहे.अशी माहिती यावेळी तहसीलदार अर्चना कापसे यांनी दिली. 
  यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की ज्या मतदरांना १८ वर्षे पुर्ण झालेली आहेत.अशा नवीन मतदारांनी आपले नांव मतदार यादीमध्ये समाविष्ट करणेकामी विहीत नमुनेमधील फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे परिपुर्ण अर्ज भरुन देवुन आपली नावे नोंदणी करावीत.तसेच सदर मोहीमेमध्ये मयत मतदार, स्थलांतरीत व गैरहजर मतदार वगळणी इत्‍यादी कामकाज करण्यात येणार आहे.तरी वरीलप्रमाणे कामकाजासाठी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे संपर्क साधावा. त्‍या अनुषंगाने मी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार कवठेमहांकाळ असे आवाहन करीत आहे.यावेळी यावेळी नायब तहसीलदार संजय पवार व केशर खुडे,निवडणूक शाखेचे व्ही आर चाटे,सुरेश बाबळेसह आधिकारी उपस्थित होते.