NC Times

NC Times

श्री समर्थ कृपा भजन मंडळाचा २३ जुन रोजी १४ वा वर्धापनदिन सोहळा व भव्य - दिव्य भजन स्पर्धेचे आयोजन

किर्तनकार ह.भ.प.श्री पंढरीनाथ महाराज आरु - ( आळंदी ) यांचं सुश्राव्य किर्तन होणार सादर...!
नवचैतन्य टाईम्स विरार प्रतिनिधी ( दिपक कारकर  )
आध्यात्मिक ओढीने,वारकरी सांप्रदायिक भक्तीने प्रतिवर्षी मोठया उत्साहाने वर्धापनदिन व भव्य -दिव्य भजन स्पर्धेचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविणाऱ्या श्री समर्थ कृपा भजन मंडळ ( नालासोपारा - विरार ) - गाडीची वेळ स.०९. ४३ ( विरार ते चर्चगेट ) यांच्या वतीने साजरा होणारा ह्यावर्षीचा १४ वा वर्धापनदिन रविवार दि.२३ जुन २०२४ रोजी एकदिवसीय आयोजनात "जीवदानी मंगल कार्यालय",मोरेश्वर विद्यालय जवळ,मोरेगाव नाका,विरार रोड,नालासोपारा ( पूर्व ) ता. वसई, जि. पालघर- ४०१२०९ येथे संपन्न होणार आहे.
ह्या सोहळ्यानिमित्ताने "संतांची शिकवण आणि भक्तीचा सोहळा" अशा पंक्ती प्रमाणे बहारदार अशी भजन स्पर्धा नियोजित करण्यात आली आहे.अनेक बक्षिसे असणारी व युट्यूब लाईव्ह प्रसारण असणाऱ्या ह्या स्पर्धेत  संत सेवा भजन सामाजिक संस्था, संत ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था या संस्थेतील १५० हुन अधिक भजन मंडळ उपस्थित राहणार आहेत.दरम्यान २०२३-०२४ वर्षातील भजन स्पर्धेत उत्कृष्ट डफली वादक व सामाजिक,शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातील भजन मंडळांचा गुणगौरव सोहळा देखील पार पडेल.
भक्तिमय वातावरणात दिवसभरच्या भरगच्च आयोजनात सकाळी ६ वा. श्री सत्यनारायण महापूजा,स. ८ वा.,दिपप्रज्वलन,सामूहिक पालखी सोहळा,पंचपदी ह.भ.श्री सदानंद गायकवाड माऊली यांचा कार्यक्रम,शिवाय भजन स्पर्धा,स्नेह भोजन,हळदी कुंकू समारंभ व हरी किर्तनकार ह.भ.प.श्री.पंढरीनाथ आरु महाराज ( आळंदी ) यांचे श्रवणीय किर्तन सादर होईल.दरम्यान मृदूंग महामेरू ह.भ.प. श्री चंदू महाराज पांचाळ यांची उपस्थिती असेल.रात्रौ ०९ वा. मान्यवर सत्कार व भजन स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.
उपरोक्त मंडळाची कार्यकारिणी संस्थापक - ह.भ.प.श्री.विश्वनाथ बांद्रे, अध्यक्ष - अरविंद मोरे,कार्याध्यक्ष -:प्रणव लांबाडे,खजिनदार - जनार्दन शिंदे ( बापू ),सचिव - सचिन धाडवे, उपाध्यक्ष - संदीप जोशी,सहखजिनदार - गजानन जोशी,उपसचिव - विशाल शिर्के,सदस्य - सत्यवान केसरकर,राजेश येले,संदीप तावडे,राजू धाडवे,आदी मंडळाचे अनेक सभासद व हितचिंतक यांच्या अथक परिश्रमाने नियोजनाची जय्यत तयारी सुरु आहे.ह्या सोहळ्याचा उत्साह वाढविण्यासाठी वारकरी भाविक,भजनप्रेमी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री समर्थ कृपा भजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.