NC Times

NC Times

आसनगाव रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या महिलेचा विनयभंग, मुंबईत पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-एककीडे लोकलमध्ये वारवांर महिला सुरक्षेतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहत असताना, आणखी एक धक्कादायक प्रकारने लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मुंबई शहरात रात्रपाळी करणाऱ्या किंवा उशीरा कामांवरुन सुटणारा एक मोठा महिला वर्ग आहे. अनेकदा प्रवास करण्यासाठी अनेक महिला लोकलमधून प्रवास करण्याला पंसती देतात पण अश्यावेळी प्रवास करत असतानाच महिलांना अनेक समस्यांना सुद्धा सामोरे जावे लागते. अशीच एक घटना आसनगाव रेल्वे स्थानकानजीक झाल्याने मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. कामावर जाण्यासाठी लोकल ट्रेनची वाट पाहणाऱ्या नर्ससोबत एका तरुणाने अश्लील हाव भाव करत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.
काल रात्रीच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्थानकावर सदरची घटना घडली आहे. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कामावर वेळेत पोहचण्यासाठी महिला नर्स नेहमीप्रमाणेच लोकलची वाट पाहत होती पण समोर असलेल्या तरुणाकडून काहीतरी घाणरेडा प्रकार सुरु आहे असे तरुणीच्या लक्षात आले. निलेशने या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले इतकेच नव्हे तर तिच्याशी जवळीक साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला. घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड करत गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही घटना सांगितली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी निलेश गायकवाड या विकृत तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
रेल्वे पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेतली आरोपी निलेश गायकवाड याला ताब्यात घेतलं. आरोपी निलेश गायकवाड ड्रायव्हर असून तो त्याच परिसरात वास्तव्याला आहे.कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत निलेश गायकवाड याला बेड्या ठोकल्या आहेत. पण झालेल्या प्रकाराने पुन्हा एकदा महिला सुरक्षितेचा प्रश्न चर्चेत आलाय. याआधीसुद्धा अनेकदा लोकलमधून प्रवास करताना महिलांसोबत विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीला धावत्या लोकलमध्ये पहाटेच्या सुमारास सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यान एका तरुणीसोबत अशीच विनयभंगाची घटना घडलीय. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी आता लोकलच्या महिला डब्ब्यात पोलिस कर्मचारी तैनात केले आहे तरी सुद्धा समाजातील काही विकृत मानसिकतेमुळे महिलांना अनेकदा अश्या घटनांना सामोरे जाण्याची वेळ येते.