NC Times

NC Times

पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता

 
महाराष्ट्रातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची माहिती समोर येतेय. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याची हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. बीडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात येईल अशी दाट शक्यता आहे. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे याचमुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या असा सूर राज्यातील काही नेत्यांचा आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केल्याचं सूत्रांकडून कळतंय.