NC Times

NC Times

खरसुंडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन सोहळा संपन्न


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)-
खरसुंडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते 1 कोटी 92 लाख रुपयाच्या विकास कामांचा उद्घाटन समारंभ पार पडला खरसुंडी येथे श्री सिद्धनाथ मंदिर आहे श्री नाथाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात गावातील सांडपाण्याचा व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेब याच्या प्रयत्नातून खरसुंडी मधील मुख्य रस्त्याच्या कडेनी आर सी सी गटर बांधकामासाठी 1 कोटी 92 लाख रु इतका मोठा निधी मिळाला त्यामध्ये भिवघाट झरे मुख्य रस्त्याला गटर व आटपाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला गटर होणार आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतिच्या फंडातून गडचि गल्ली येथे पेविंग ब्लॉक या कामांचा शुभारंभ आमदार पडळकर साहेब यांच्या हस्ते झाला यावेळी विलास काळेबाग संघटन मंत्री भाजपा सांगली जिल्हा, धोंडीराम इंगवले सरपंच खरसुंडी राजक्का कटरे, तानाजी शिरसागर, शफिक तांबोळी, किरण पुजारी राहुल गुरव किशोर पुजारी गजानन खरात सरपंच घुलेवाडी, विजय राजगे सरपंच बाळेवाडी संजय कोळेकर अंकुश नवनाथ कटरे, विलास जानकर, दिलीप सवने, विक्रम भिसे स्वप्निल जाधव आबा साळुंखे पीडब्ल्यूडी अभियंता सतीश बुर्ले साहेब सहाय्यक अभियंता बुरुंगले साहेब इत्यादी उपस्थित होते