NC Times

NC Times

माझी फसवणूक केली राजू शेट्टींचा ठाकरे आणि पवारांवर गंभीर आरोप


नवचैतन्य टाईम्स  कोल्हापूर प्रतिनिधी(प्रविण पाटील) 
-लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीपासून हातकणंगलेची जागा राजू शेट्टींना सोडली, असे महाविकास आघाडीकडून बोललं जात होत. यासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील आणि सतेज पाटील या नेत्यांनी माझ्यासोबत शेवटपर्यंत सकारात्मक चर्चा केली. मी उमेदवार असल्याने पक्षश्रेष्ठींशी बोलाव अशी त्यांची भूमिका होती. यामुळे मी उद्धव ठाकरे यांना दोन वेळा भेटलो तसेच शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. निवडणुकीनंतर माझी भूमिका काय असेल या संदर्भात त्यांनी ड्राफ्ट तयार केला. मात्र नंतर त्यांना जे करायचं आहे त्यांनी तेच करत माझी फसवणूक केली,असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला आहे.
 मविआकडून राजू शेट्टींना उमेदवारी मिळणार होती
लोकसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. या संदर्भात राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट देखील झाली मात्र उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली चर्चा एन टायमाला फीसकटली आणि महाविकास आघाडीने मशाल चिन्हावर माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी दिली.
दरम्यान महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत चाव्या कोणी फिरवल्या माहीत नाही असे म्हणत राजू शेट्टी यांनी देखील एकला चलो रे ची भूमिका घेत अपक्ष निवडणूक लढली मात्र या निवडणुकीत दोघांचा देखील पराभव झाला आणि मत विभागणीचा फायदा महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना झाला.
मात्र आता निवडणुकीत राजू शेट्टी यांचा दारुण पराभव झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी च्या नेत्यांसोबत काय चर्चा झाली. हे उघड केले असून यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजू शेट्टी यांना जागा सोडू असे बोलले जात होते. मी उमेदवार असल्याने पक्षातील नेत्यांना भेटावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मी दोन वेळा उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, असे शेट्टी म्हणाले.
शरद पवार यांच्यासोबत देखील दूरध्वनीवरून मी चर्चा केली. कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील आणि जयंत पाटील यांचीही भेट घेतली. निवडणुकीनंतर माझी भूमिका काय असणार या संदर्भात सतेज पाटील आणि जयंत पाटील यांनी माझ्याकडून ड्राफ्ट तयार करून घेतला. मात्र त्यांनी अचानक त्यांना जे करायचं तेच केलं आणि आपला उमेदवार जाहीर केला त्यांनी माझी फसवणूक केली, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.