NC Times

NC Times

नागज येथे बहुजन कामगार संघटनेच्या वतीने संसारउपयोगी भांड्याचे वाटप


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)- बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब कष्टकरी असंघटित कामगार की जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत आहेत अशा कामगारांना डॉ शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण सात हजार रुपये किमतीच्या जिवनाअवश्यक अशा भांड्याचे वाटप करण्यात आले.एवढेच नाही तर सदर कामगार संघटनेच्या माध्यमातून इतरही २५ ते ३० योजना राबविल्या जातात हे कौतुकास्पद आहे. 
यामध्ये मुलांचे शिक्षण,आरोग्य(दवाखाना),मुलींचे लग्न,        कामावर लागणारे साहित्य,मृत्युनंतर अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये,मृत कामगाराच्या पत्नीला पेन्शन,मृत कामगाराच्या वारसांना दोन ते पाच लाख रुपये पर्यंतच्या योजना राबविल्या जात आहे.तरी असंघटीत कामगारांनी अशा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी डॉ शंकरदादा माने यांनी केले. करण्यात आले. 
     अशा वेगवेगळ्या योजना संघटनेच्या वतीने तासगांव- कवठेमहांकाळ तालुक्यात राबविल्या जात असून,यासाठी वेगवेगळ्या भागांत कॅम्प घेऊनही कामगारांना एकत्र करून त्यांना लाभ मिळवून दिला जात आहे.
    नागज (ता कवठेमहांकाळ) येथेही अशा प्रकारचा कॅम्प पार पडला.येथे मोठ्या प्रमाणात कामगारांनी गर्दी केली होती.येथे कामगारांना भांडी वाटण्यात आली.यावेळी संघटनेचे सर्वस्वा डॉ शंकरदादा माने,सुभाष मराठे,जालिंदर मोहीते,सौ सविता माने,वैभव शिंदे,गौतम कांबळे,तनिष्का शहा,सुनील खोत,उत्तम कुरणे,विशाल कर्पे,प्रिया धोपटे,    इंद्रजित सोनवणे,नितीन कुरणे,मच्छिंद्र मोहीते,संजय सनदी नाथा आठवले,काजल आठवले,सचिन दहींगडे सह अन्य      पदाधिकारी,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी    आभार सौ सविता माने यांनी मानले.